टेंभुर्णी येथे राष्ट्रीय महामार्गावर सिगरेटचा टेम्पो लुटला ९९ लाख रुपयांचा माल लंपास

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सिगरेट घेऊन निघालेला टेम्पो ६ ते ७ अज्ञातांनी लुटून ९९ लाख रुपयांचे सिगरेटचे बॉक्स लंपास केल्याची घटना टेंभुर्णी येथे घडली याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून मिळालेली अधिक माहिती अशी की टेम्पो चालक मोहम्मद इमतियाज मोहम्मद मुमताज (वय. ३८ वर्षे रा.हैद्राबाद) हा दि २१ रोजी आयशर टेंम्पो क्रमांक ए.पी.२२.टी.ए.-२९७२ मध्ये एका जोडीदारासह चारमिनार कपंनीचे ९९,३७,१७५.५ किंमतीचे सिगारेटचे २५० बाँक्स घेऊन पुणेकडे जात असताना. दिनांक २१ रोजी रात्री ७:३० चे सुमारास टेभुर्णी ता. माढा येथील अहमदनगरकडे जाणारा ब्रीज ओलांडून पुढे गेल्यानंतर सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर साधारण २ ते ३ कि. मी. अंतरावर अनोळखी ६ ते ७ अज्ञात चोरट्यांनी टेम्पो आडवून चालक व त्याच्या जोडीदार शिवीगाळ करीत दमदाटी व मारहाण करून जखमी करीत टेम्पो मधील ९९,३७,१७५.५ रुपये किंमतीची चारमिनार कंपनीचे सिगारेटचे २५० बॉक्स टेम्पो मधून काढून नेल्याची फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी ७ अज्ञात आरोपीन विरूद्ध भा द वि कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून. घटनास्थळी सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव व करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी भेट दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पो नि सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून इतक्या मोठ्या किंमतीचा मुद्देमाल गेल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. पोलिस आरोपींना कधी जेरबंद करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव व करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके तैनात केली असून या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेल बंद करणार असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले.
0 Comments