Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगरच्या कदम परिवाराने औद्योगिक क्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद

 अनगरच्या कदम परिवाराने औद्योगिक क्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद

युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांचे गौरवोदगार
मोहोळमध्ये आर. के. कन्स्ट्रक्शनचा थाटात शुभारंभ


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसाय करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी केले.स्थापत्यशास्त्र हे सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे शास्त्र आहे. स्थापत्य अभियंता क्षेत्रात विभागात करिअर करणाऱ्या युवकांना अनेक लोकांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या पाठबळावर अनगरच्या कदम परिवाराने औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय यश कमावले आहे.मोहोळ सारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आर. के. कंन्स्ट्रक्शन दालनाच्या माध्यमातून कदम परिवारातील युवा स्थापत्य अभियंता स्वप्निल कदम यांनी सुरू केलेले आर के कंन्स्ट्रक्शन हे दालन निश्चितपणे शहरवासीयांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी व्यक्त केला.
मोहोळ तालुक्यातील प्रथितयश युवा स्थापत्य अभियंते स्वप्निल पोपटराव कदम यांच्या आर. के. कंस्ट्रक्शन या नव्या दालनाचा शुभारंभ माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच  झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजिंक्यराणा पाटील बोलत होते.
यावेळी राजेंद्र खर्गे महाराज, बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे, उद्योजक वैभवबापू गुंड, उपसभापती अशोक सरवदे, नारायण गुंड, दैनिक कटूसत्यचे संपादक पांडूरंग सुरवसे, नगरसेवक मुश्ताक अहमद शेख, नागेश भोसले, राजशेखर घोंगडे, बाजार समितीचे सचिव सचिन पाटील, भैय्या कोरे, मंगेश पांढरे ,डॉ. डोंगरे, नसीर मोमीन, राजू सुतार यावेळी सर्वांचे स्वागत उद्योजक राम कदम आणि स्वप्नील कदम यांनी केले. यावेळी
शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments