राष्ट्रवादीची प्रभाग जनसंवाद यात्रा प्रभाग 24 मध्ये जोश्यात संपन्न....


शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना -
*श्रेयस राऊत प्रभाग 24 अध्यक्ष* याने प्रभागातील युवावर्गाला भेडसावत असलेल्या प्रश्नांबाबत प्रमुख्याने मुद्दा उपस्थित केला.
*अक्षय साठे* या युवक पदाधिकाऱ्याने प्रभागातील रस्ते दिवाबत्ती तसेच उद्यानांची बकाल अवस्था सांगत कित्येक ठिकाणी ड्रेनेज उपलब्ध नसल्याचे सांगितले.
*मुसा अत्तार* आम्हा पदाधिकाऱ्यांची टीम नागरिकांच्या मदतीसाठी तयार असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक मध्ये नागरिकांच्या मदतीने जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादीचे कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार.
*अमीर शेख* ह्या विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य लोकांसमोर आता प्रश्न पडला आहे की इथला आमदार आणि प्रभाग नगरसेवक नेमके करतात काय? निवडून दिले की झाले का...घरातच बसून.. लोकांचे प्रश्न सोडवायला कधीच समोर येत नाहीत.
*सुनिता रोटे* येणारी मनपा निवडणूक ही वॉर्ड निहाय होईल की कसे ते लवकरच कळणार असून सध्या मी नगरसेविका असल्याने स्वतः मनपा मधली अवस्था पाहते आहे, सत्ताधारी पक्ष पूर्णपणे निष्फळ ठरला आहे. माझ्यासोबत येणाऱ्या काळात जास्तीत जास्त महिला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्या.
*जुबेर बागवान* आपल्या देशाचा गृहमंत्री तडीपार होते आणि आता ह्या प्रभागातील नगरसेवक, उपमहापौर हे देखील तडीपार...लोकांना दमदाटी करून अन् फसवून निवडून आले पण आता असल्यानं कायमचे घरी बसवून कारभारी बदलायची वेळ आली आहे.

*राजन जाधव* शहरात एकेकाळी परिवहन ची सुबत्ता होती पण आता आबाळ झाली आहे, स्मार्ट सिटी अन् रस्ते व्यवस्था चकाचक झाली म्हणत सत्ताधारी ओरडुन सांगत आहेत पण रस्त्यावर बसेस कुठे आहेत. जनतेची घोर फसवणूक केली आहे. पुन्हा एकदा नागरी वाहतूक व्यवस्था सुरू होऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी हा एकमेव पर्याय अन् एकट्याने संपूर्ण शहरात निवडणूक लढविण्यासाठी सक्षम आहोत.
*संतोष पवार* ह्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असून पालकमंत्री यांच्या सहकार्याने तसेच शहरात राष्ट्रवादी ला उभारी देण्यासाठी युवा वर्ग तसेच समोर लक्षणीय उपस्थित महिला वर्गाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन पाहता यावे यासाठी राष्ट्रवादीवर आपण विश्वास व्यक्त केला तो आम्ही फेल ठरू देणार नाही.

*भारत जाधव* शहर अध्यक्ष या नात्याने प्रमुख जबाबदारी असून भागातील इच्छुक उमेदवारांचे जनतेशी जोडली गेली असलेली नाळ लक्षात घेता सध्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांची सर्वार्थाने मदत करण्यासाठी बांधील असणार आहोत.
जनसंवाद करण्यासाठी मंचावर मान्यवर नेते, पदाधिकारी भारत जाधव, संतोषभाऊ पवार, राजन (भाऊ)जाधव, सुनीताताई रोटे, जुबेर बागवान, मिलिंद गोरे, सागर शितोळे, सरफराज शेख, आबादीराजे, मकबूल मुल्ला, आशिष जेटीथोर, मुसा अत्तार, सरफराज बागवान, ज्योतिबा गुंड, गौरा कोरे, बाळासाहेब मोरे यांचे समवेत राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा पदाधिकारी अनिल बनसोडे संजय पाटील किशोर चव्हाण प्रवीण साबळे शाहरुख हुच्चे शरीफ इनामदार तसेच प्रभागचे पदाधिकारी श्रेयस राऊत दत्ता वाघमोडे संगीता अवताडे अजित झाकणे संगीता साळुंखे मीरा क्षीरसागर सविता शानबाग किरण राऊत आनंद राठोड हनुमंत बिराजदार प्रदीप घाटे वैभव शिंदे ह्यांची उपस्थिती होती.
यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश निंबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन किशोर चव्हाण यांनी केले.
0 Comments