Hot Posts

6/recent/ticker-posts

संजय गांधी, श्रावणबाळ अनुदान त्वरित जमा करा

 संजय गांधी, श्रावणबाळ अनुदान त्वरित जमा करा



राष्ट्रवादीची मागणी, महिला शहराध्यक्ष यशोदा कांबळे यांनी दिले निवेदन


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यासाठीचे निवेदन माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी मोहोळ शहर महिला अध्यक्षा यशोदा कांबळे यांनी मोहोळचे नायब तहसीलदार लीना खरात यांना देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली.
   यावेळी यशोदा कांबळे यावेळी म्हणाल्या की कोरोना महामारीच्या काळापासून शहर व तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत वयोवृद्ध घटस्फोटित परित्यक्ता विधवा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग लाभार्थ्याचे सुमारे तीन महिन्यापासून चे अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांकडून अनुदान मागण्या संदर्भात शासकीय कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत परंतु कार्यालयाकडील कर्मचारी अधिकारी आणि येणाऱ्या वयोवृद्ध ,अपंग ,विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या , महिलांना शासनस्तरावरून अनुदान प्राप्त झालेले नाही.
तुटपुंज्या तुटपुंज्या शासनाच्या अनुदानावर हे लाभार्थी आपले उदरनिर्वाह भागवत असून यांना आर्थिक स्त्रोत अन्न असल्याने या अनुदानात कडे सामान्य लाभार्थ्यांचा कल असल्याने हे अनुदान शासनाने तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे. याबाबतची दखल घेत राष्ट्रवादी  आघाडीच्या महिला अध्यक्ष यशोदा कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन प्रलंबित  प्रलंबित असणारे तीन महिन्याचे  लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विकास कोकाटे, सत्यवान भानवसे , नागनाथ मोकाशी ,दादासाहेब पाटील , विश्‍वजित मोकाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments