मोहोळ येथील न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन तब्बल अडीच कोटीच्या रकमेच्या दाव्यांची तडजोड

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-शासनाने सुरू केलेल्या लोकअदालती सारख्या सामाजिक उपक्रमाचा नागरिक व पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपसात असणारी गोडी कायम ठेवावी असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर एन गायकवाड यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या निर्देशानुसार मोहोळ येथील न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी न्यायाधीश गायकवाड मार्गदर्शन करीत होते. यावेळी लोकअदालत तिची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली, हा आदर्श नवीन पायंडा मोहोळ न्यायालयाने पडला. यावेळी दिवाणी न्यायाधीश गायकवाड यांच्यासह न्यायाधीश पी आर कुलकर्णी, विस्ताराधिकारी कुंडलिक गावडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पॅनल विधीज्ञ एन व्ही कांबळे ,टी डी आगलावे, एस यु भंडारी,एस ०ही जानराव, एस पी कुलकर्णी,सहाय्यक अधीक्षक एन आय बागायत, विधी सेवेचे शिवकुमार आलूर उपस्थित होते.
यावेळी एकूण 716 न्यायालयीन खटले तडजोडीसाठी ठेवले होते . त्यापैकी 64 प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. एकूण 2 हजार 836 दाखल पूर्व प्रकरणां पैकी 287 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालती मधे एकूण दोन कोटी 48 लाख 80 हजार रुपये एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीते साठी रुपेश ऐतवारे, विधी स्वयंसेवक महेश शिंदे, अस्लम मुलानी, ग्रामसेवक, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments