एकीकडे जनतेच्या पैशाची लूट करून दुसरीकडे महागाई वाढवणाऱ्या सरकाराला देश माफ करणार नाही

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख यांचे कडवे टिकास्त्र मोहोळमध्ये केंद्र सरकाराच्या महागाईच्या निषेधार्थ आंदोलन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- केंद्राच्या मोदी सरकारने देशावर अनेक अन्यायकारक गोष्टी लादल्या असून शेतकऱ्यांसह महिला वर अन्याय करणे, हा त्यांचा अजेंडा आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई करून सर्वसामान्य जनतेची लुट भाजप सरकार करत असून यासाठी आम्ही केंद्र सरकारचा निषेध करीत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख यांनी केले.
केंद्रामधील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरकार हे देशाचे आर्थिक स्थैर्य, अखंडता, सार्वभौमत्व, व्यक्ती स्वातंत्र्य व देश हिताच्या विरोधी कायदे करून देशांमध्ये होत असलेल्या महागाईच्या विरोधात तीव्र निषेध करणारे आंदोलन काँग्रेस, महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व समविचारी पक्षाकडून मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी शाहीन शेख बोलत होत्या.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अशोक देशमुख म्हणाले की, देशामध्ये आतापर्यंत काँग्रेसने सर्व क्षेत्रांमध्ये विकासात्मक काम केले होते, मात्र गेल्या सात वर्षात भाजपाच्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेत काही लोकांच्या हातात सूत्रे देत सर्व क्षेत्राचे खाजगीकरण करताना दिसत आहेत. महागाई गगनाला भिडली असून अनेक शेतकरी विरोधी कायदे केले आहेत. भावी पिढीच्या भविष्यासाठी मोदी सरकारला हटवण्याची गरज असल्याचेही यावेळी देशमुख यांनी सांगितले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून भाजप सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, सभापती रत्नमाला पोतदार, सुरेश शिवपुजे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, जिल्हाध्यक्ष गौरव खरात, मुन्ना हरणमारे, संतोष शिंदे, विनायक सरवदे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सिंधुताई वाघमारे, रुपेश धोत्रे, यशोदा ढवळे, स्मिताताई कोकणे, किशोर पवार, कांतीलाल राऊत, काँग्रेस शहराध्यक्ष अँड. पोपट कुंभार, कृष्णदेव वाघमोडे, कांतीलाल राऊत, बिलाल शेख, हेमंत गरड, सुरेश हावळे, लता पाटील, बिरा खरात, नागेश बिराजदार, शाहीर मोरे, राहुल कुरडे, अनंत नागणकेरी, भीमराव वसेकर, अमजद शेख आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments