Hot Posts

6/recent/ticker-posts

चव्हाणवाडी (टें) येथे 155 कोरोना लसीकरण संपन्न

 चव्हाणवाडी (टें) येथे 155 कोरोना लसीकरण संपन्न





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-सर्व जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातलेले असून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लसीकरणावरती भर दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून आज ग्रामपंचायत चव्हाणवाडी येथे 155 नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याचे नियोजन 8 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्यावतीने व ग्रामपंचायत चव्हाणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सकाळी 9 वा. लसीकरनास सुरुवात झाली परंतु 30 लसीकरण संपन्न झाल्यानंतर गावांमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लसीकरनास अडथळा निर्माण झाला. लसीकरणासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा केल्या होत्या. आता पुढे लसीकरण होणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला होता परंतु आरोग्य विभाग परितेच्या कार्य तत्परतेमुळे व ग्रामपंचायत वेणेगाव यांच्या सहकाऱ्यांनी उर्वरित 125 नागरिकांचे लसीकरण मौजे वेणेगाव येथे करण्यात आले. या लसीकरणासाठी चव्हाण वाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुनील मिस्कीन, उपसरपंच बाळासाहेब मोठे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, हनुमंत चव्हाण, रमेश नांगरे, श्रीअर्जुन  सलगर, ग्रामसेवक साळुंके भाऊसाहेब, सावंत गुरुजी तसेच चव्हाणवाडी तील युवा नेतृत्व संग्राम चव्हाण, अमोल इंदलकर, सागर पवार व आदित्य मिस्कीन यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या लसीकरणासाठी डॉक्टर सोमनाथ गोरे, आरोग्य सेविका दुधाळ, इस्माईल सय्यद, राजश्री खोटे व पुनम सुतार यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments