आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण कोव्हीड योद्धा पुरस्काराने सन्मानित

कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त):-कोरोनाच्या काळात अविरतपणे सेवा बजावणाऱ्या तुकाराम पायगन यांना नॅशनल इंटिग्रेटल मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुर्डूवाडी येथील पंचायत समिती सभागृहात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आय. एम. एचे अध्यक्ष डॉ.आशिष शहा, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.नवजीवन शहा, डॉ.जयंत करंदीकर, डॉ. विश्वेश्वह माने, गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी शिवाजी थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षका डॉक्टर सुनंदा रणदिवे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, सपोनी विक्रांत बोधे आदींच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
0 Comments