Hot Posts

6/recent/ticker-posts

यलमार मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारास ग्रामस्थ वैतागले

 यलमार मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारास ग्रामस्थ वैतागले



नागरिक ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत     


 सांगोला (कटूसत्य वृत्त):- राज्यात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविलेल्या यलमार मंगेवाडी गावचा कारभार रामभरोसे असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून येत आहेत. सर्वत्र कोरोनाची संख्या वाढत असताना ग्रामपंचायतीने सर्वच जबाबदारी आरोग्य विभागावर देवून झोपेचे सोंग घेतले आहे.कोरोना लसीच्या बाबतीत सत्ताधारी गटाकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून बोलल्या जात आहेत. लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आम्ही सांगितलेल्या लोकांनाच लस द्या,असा उपरोधिक सल्ला ही सरपंच,उपसरपंच आणि सदस्या कडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यलमार मंगेवाडी ग्रामपंचायती विरोधात नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
 नव्याने स्थापन झालेल्या नवीन सत्ताधाऱ्यानी चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीचा कारभार करावा. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून बेकायदेशीर कामे करून घेऊ नयेत.  ग्रामपंचायत सदस्य यांनी  सूडबुद्धीने वागू नये , गावामध्ये अंधाराचं व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे तरी गावातील दिवाबत्ती व स्वच्छता याकडे लक्ष द्यावे , गावामध्ये वाड्या वस्त्यावर या पावसाळ्यात लोकांना जाण्या-येण्यासाठी बांधावरील रस्ते मुरमीकरण करून द्यावे , पिण्याच्या पाण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करावे.तसेच सूडबुद्धीने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे व त्यांना विनाकारण त्रास देऊ नये सत्तेचा गैरवापर करून लोकांना त्रास देऊ नये .अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.               

Reactions

Post a Comment

0 Comments