टेंभुर्णी पोलिसांची वाळू माफियावर कारवाई एक पोलीस कर्मचारी जखमी,ट्रॅक्टर जप्त,एकजण ताब्यात

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-भीमा नदीतून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर टाकळी टे येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वाळू उपसा करणाऱ्यांनी अंगावर ट्रॅक्टर घालून व टॉमीने मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .
.ही घटना बुधवारी दि.२५ ऑगष्ट रोजी पहाटे ०५ वा.सुमारास घडली.या प्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.सुधीर सोरटे,महादेव शेळके,समाधान जरक सर्वजण टाकळी (टें) ता.माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तर पोकॉ तुकाराम माने-देशमुख असे नेमणूक टेंभुर्णी पोलीस ठाणे असे जखमी पोलीस कर्मचारी यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,भीमा नदीतून चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती.या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोकॉ तुकाराम माने-देशमुख व पोकॉ बाळराजे घाडगे हे टाकळी (टें) येथे भीमा नदी पत्रात गेले होते.त्यावेळी नदी पत्रामधून अवैधपणे वाळू उपसा करून तिघेजण त्यांच्या समोरून वाळू भरलेला ट्रॅक्टर जात होता.तो ट्रॅक्टर अडवून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले असता.त्यांनी नकार देत तिघांनी संगनमताने पोकॉ माने-देशमुख व पोकॉ घाडगे यांना धक्काबुक्की केली.तर ट्रॅक्टर मध्ये बसलेला सुधीर सोरटे हा हातात टॉमी घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्यास अंगावर आला.तसेच ट्रॅक्टर मालकाने त्याच्या ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर जाऊ दे व पोलीस आडवे आले तर घाल अंगावर असे सांगितले.

यामुळे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जोरात चालवून पोकॉ तुकाराम माने-देशमुख यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी पोकॉ माने देशमुख हे बाजूला खाली पडून जखमी झाले.यामध्ये पोलीस कर्मचारी यांची मोटार सायकल (क्र-एमएच-४५-एम-७२७०) व बाजूला उभी असलेली बोलेरो जीप-पांढरी याचे नुकसान झाले आहे.पोलिसांनी आरोपी कडील वाळूने भरलेला ट्रॅक्टर स्वराज लाल (क्र-एमएच-४२-क्यू-३३९४) जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुधीर सोरटे यास ताब्यात घेत अटक केली आहे तर दोनजण अद्याप फरार आहे.नूतन पोनि सुरेश निंबाळकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचा पदभार घेताच कारवाईस प्रारंभ केला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुशील भोसले हे करीत आहेत.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यांतर्गत अवैध व्यवसाय,वाळू उपसा या प्रमाणे इतर अवैध व्यवसाय सुरू असल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.किंवा मोक्का सारख्या संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा नूतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.
0 Comments