Hot Posts

6/recent/ticker-posts

अंत्यविधी करण्यास विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी : नगरसेवक बनसोडे

 अंत्यविधी करण्यास विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी : नगरसेवक बनसोडे


सांगोला (कटूसत्य वृत्त):- माळेवाडी (बोरगाव) ता. माळशिरस येथील मातंग समाजाच्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यास विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
माळेवाडी (बोरगाव) ता. माळशिरस येथील मातंग समाजातील व्यक्तीचे निधन झाले. परंतु त्या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमी अंत्यविधी करण्यास गावातील काही समाजकंटकांनी विरोध केला. वास्तविक पाहता ही घटना फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालणारी घटना असून, ही घटना वारंवार घडू नये म्हणून ह्या प्रवृत्तीच्या व्यक्तीवर व ह्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई केल्याशिवाय ही प्रवृत्ती थांबणार नाही. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत अशी घटना घडणे निंदनीय असून, ठराविक समाजच दलितांवर अन्याय करीत आहे. जसे पीडित व्यक्तीच्या जातीचा मातंग असा उल्लेख केला गेला तसेच अन्याय करणाऱ्या घटकाच्या जातीचा पण उल्लेख करावा. म्हणजे सबंध महाराष्ट्राला समजेल दलितावर नेमके कोण अन्याय करीत आहे. तर सदर व्यक्तीवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, यापूर्वी त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते. त्यात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढून कायद्याचा धाक उरला नाही. तरी त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देतेवेळी आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अरुणआण्णा बनसोडे, कड्लासचे सरपंच दिगंबर भजनावळे, आरपीआय मातंग आघाडीचे जिल्हा नेते अण्णासो गस्ते, बापू वाघमारे, अरुण भजनावळे, अनिकेत कांबळे, सुनील भजनावळे, आरपीआय तालुकाध्यक्ष दीपक होवाळ, गुणवंत जगधने, पोपट तोरणे, महेंद्रा अण्णा बनसोडे, भारत खंदारे, किशोर झेंडे, निखील गडहिरे, दुर्योधन बनसोडे, लखन माने उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments