टेंभुर्णी येथे डेंग्यू सदृश्य आजाराने सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील भवानीनगर मध्ये राहणाऱ्या वाहन चालक अमोल कदम यांच्या लहान मुलगी सई अमोल कदम (वय ६) हिचा डेंगू सदृश्य आजाराने इंदापूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.या घटनेची सविस्तर समजलेली माहिती असे की टेंभुर्णी येथील भवानीनगर येथे राहत असलेल्या वाहन चालक अमोल कदम यांची लहान मुलगी सई अमोल कदम ही गेल्या चार ते पाच दिवसापासून आजारी होती. ताप येत असल्याने असल्याने सईला टेंभुर्णी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ऍडमिट केले होते. त्यानंतर ताप कमी झाल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र पुन्हा घरी गेल्यानंतर ताप वाढू लागल्याने तिला घरांमध्येच अंगणात खेळत असताना चक्कर येऊन पडली त्याच बरोबर तिला पुन्हा टेंभुर्णी येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु ती बेशुद्ध असल्यामुळे तिला ताबडतोब इंदापूर येथील कदम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तिला जास्त ताप असल्याने तो मेंदूला भिडला होता त्यामुळे ती बेशुद्धावस्थेत तिला उपचार चालू केले, परंतु तिचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी तीला मृत्यू झाल्याचे घोषित केले असून. या वर्षीचा डेंगू सदृश्य आजाराचा पहिला बळी गेला असून या मुलीच्या मृत्यूमुळे टेंभुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत असून डेंगू सदृश्य साथीला रोखण्यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायत ने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
0 Comments