महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

 महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर



पुणे (कटूसत्य वृत्त):-  केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२०-२१ साठी महाराष्ट्रातील ५०० माजी सैनिक पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज शिफारस करुन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले होते, त्यामधील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच अर्ज केलेल्यांपैकी ८२.६० % पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृती मंजूर झाली आहे. यापैकी देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. राज्यातील ४१३ माजी सैनिक पाल्यांकरिता शिष्यवृत्तीची रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ८ हजार आहे. दरवर्षी कोर्सचा कालावधी असेपर्यंत प्राप्त होणार आहे, असे पुणे सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages