कोळा विद्यामंदिरचे NMMS परीक्षेत उज्ज्वल यशनऊ विद्यार्थ्यांना मिळणार चार वर्षात मिळणार प्रत्येकी रु.48000/- शिष्यवृत्ती

कोळा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून यामध्ये कुमारी पोरे प्राजक्ता गणेश (GEN.- 22) गुण - 137, कुमारी तांबोळी तनाज जावेद (GEN.- 64) गुण - 125, कुमारी हातेकर निकिता दत्तात्रय (GEN.- 111) गुण - 118, कुमारी गोडसे शिवकन्या शंकर (GEN.- 152) गुण - 114, कुमारी कोरे आरती अशोक (OBC - 6) गुण - 108, कुमार व्हनमाने निलेश उत्तम (NTC - 13) गुण - 105, कुमार करांडे तुषार संभाजी (OBC - 63) गुण - 94, कुमार क्षीरसागर आयुष सतीश (OBC - 62) गुण - 94, कुमारी हातेकर हर्षदा अंकुश (SC - 39) गुण - 86 या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रतिमहिना रु.1000/- प्रमाणे पुढील चार वर्षात प्रत्येकी रु.48000/-प्रमाणे या सर्वांना भविष्यात एकूण रु.432000/- शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
यशस्वी विद्यार्थी,पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा प्रशालेमध्ये प्राचार्य नारायण विसापुरे सर आणि पर्यवेक्षक रफिक मणेरी सर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
वरील विद्यार्थ्यांना प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख वैभव कोठावळे,विभाग प्रमुख शत्रुघ्न भांगरे,दिप्ती काशीद,सचिन बुंजकर,निलेश कांबळे,सुखदेव कोळेकर,प्रसादसिंह आदाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर,सचिव म.शं.घोंगडे सर,खजिनदार शं.बा.सावंत सर,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब तसेच कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके साहेब,प्राचार्य नारायण विसापुरे सर,पर्यवेक्षक रफिक मणेरी सर,संस्थाबाह्यपरीक्षा विभाग प्रमुख शिवाजी चौगुले,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह कोळा पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
0 Comments