Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तहसील समोर रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्याचा 23 पासून कुटुंबासह उपोषणाचा इशारा

 माढा तहसील समोर रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्याचा 23 पासून कुटुंबासह उपोषणाचा इशारा




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आलेगाव (बु) तालुका माढा येथील शेतकरी राजेंद्र रामचंद्र देवकर यांच्या शेताजवळून जाणारा पानंद रस्ता दुसऱ्या शेतकऱ्याने अडवल्यामुळे देवकर यांनी कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर 23 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा तहसीलदार माढा यांना पत्राद्वारे दिलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आलेगाव तालुका माढा येथे राहणारे राजेंद्र रामचंद्र देवकर यांच्या कुटुंबात एकूण १५ सदस्य असून ते सर्व एकत्र राहतात. त्यांची आलेगाव मध्ये गट नंबर १५६ ही स्वमालकीची जमीन असून. ही जमीन आलेगाव चांदज शिवे वरती पानं रस्त्यालगत असून ते पूर्वीपासून या रस्त्यावरून ये-जा करीत होते. परंतु काही दिवसापूर्वी चांदज हद्दीतील काही शेतकऱ्यांनी  या रस्त्याच्या कडेला जेसीबी व ट्रॅक्टर च्या साह्याने खड्डा करून रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता आडविला असुन. सदरचा रस्ता हा नकाशा मध्ये नमूद असून त्याच्यावरती पुनर्वसन मधून त्या रस्त्याचे खडीकरण ही यापूर्वी झालेले आहे. सदर प्रकरणाबाबत राजेंद्र देवकर यांनी वारंवार तहसील कार्यालयात खेटे मारून ही राजेंद्र देवकर यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे राजेंद्र देवकर यांनी 23 ऑगस्ट पासून सहकुटुंब तहसील कार्यालय माढा येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा तहसीलदार माढा यांना दिला आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments