नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई आनंदा माने यांचा वाढदिवस राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यामध्ये अहिल्यानगर, राजमाता नगर गुळमिरे कॉलनी, बिलेवाडी जिल्हा परिषद शाळा याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेवक तथा गटनेते आनंदा माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, अरुण पाटील, राजू ढोले सर, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, देविदास गावडे, सौ. कविताताई गावडे, सौ. कौशल्याताई गावडे, सौ. पल्लवीताई पांढरे, म्हाळाप्पा शिंगाडे, आरिफ मुलाणी, दिलीप जानकर, बिटू मुलाणी, शरद गावडे, सोमनाथ पारसे, शेखर गडहिरे, बिटू माने, वैभव बदडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
0 Comments