मानांकराजेच्या उपचारासाठी मदत करण्याचे चेतनसिंह केदार-सावंत यांचे आवाहन


सांगोला (कटूसत्य वृत्त):- ड्युशेन मस्क्यूलर डिस्ट्रोफी (स्नायू कमकुवतता) या दुर्मिळ आजाराचे निदान झालेल्या मानांकराजे पाटील या मुलाच्या उपचारासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरी सांगोला शहर व तालुक्यातील दानशूर मंडळी, संस्था यांनी मदत करावी असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
मानांकराजे अभिजीत पाटील या दुसरीत शिकणाऱ्या मुलाला ड्युशेन मस्क्यूलर डिस्ट्रोफी (स्नायू कमकुवतता) या दुर्मिळ आजाराचे निदान झाले असून यावर उपचार करण्यासाठी भारतात औषध उपलब्ध नाही. यासाठी परदेशातून औषधे उपलब्ध करून मानांकराजे पाटील याच्यावर बेंगलोर येथील डार्ट या रिसर्च सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा खर्च पाटील कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मानांकराजे पाटील याच्यावर उपचार करण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील दानशूर मंडळी, संस्था यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
0 Comments