Hot Posts

6/recent/ticker-posts

महूद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लॅबोरेटरी मशीनचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न

 महूद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लॅबोरेटरी मशीनचे आमदार शहाजीबापू  पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न



सांगोला (कटूसत्य वृत्त):- काल दिनांक१ जुलै रोजी महूद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून मिळालेल्या एच ए एल क्लाऊड क्लिनिक लॅबोरेटरी मशीनचे उद्घघाटन  आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले
मानवी शरीरात असणाऱ्या आवश्यक अश्या 23  पॅरामिटर ची तपासणी आहे या मध्ये प्रामुख्याने
वजन व उंचीशी निगडित असणारे पॅरामिटर ब्लडप्रेशर,ऑक्सीमीटर, तापमान मापक,ब्लडशुगर, हिमोग्लोबीन इत्यादीची तपासणी एकाच मशीनवर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात होणार आहे त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे नागरिकासाठी ह्या मशीन वर मोफत तपासणी होणार असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचणार आहेत म्हणून नागरिकांनी या मशीनचा  पुरेपूर फायदा करून घ्यावा असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आवाहन केले आहे,
यावेळी जि प सदस्य गोविंद जरे, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,वैद्यकीय अधिकारी  डॉ कल्याण ढाळे,डॉ खांडेकर, व्हीपि माने,आरोग्यसेविका माधुरी सावंत, आरोग्य सेविका रंजना व्हनमाने,प्राथमिक आरोग्य केंद्र महूद मधील कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments