Hot Posts

6/recent/ticker-posts

करकंब ग्रामपंचायतीमधील आठ विरोधी सदस्यांचे १३ जुलैपासून पंढरपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण

करकंब ग्रामपंचायतीमधील आठ विरोधी सदस्यांचे १३ जुलैपासून पंढरपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण



करकंब (कटूसत्य वृत्त):-करकंब ग्रामपंचायत १९३५ साली स्थापन झाली परंतु सध्या ग्रामपंचायत करकम मध्ये ज्या प्रकारचा कारभार चालू आहे त्याबद्दल बोलताना माजी सरपंच मारुतीअण्णा देशमुख यांनी  संगीतलेकी मी १९७२ पासून ग्रामपंचायत सदस्य आहे त्यामध्ये मी पाच वर्षे सरपंच व दहा वर्षे उपसरपंच होतो परंतु अशा प्रकारचा चाललेला कारभार या अगोदर कधीच पाहिला नाही चालू ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार दलित वस्तीतील कामे पाणीपुरवठा व लाईट यामध्ये अनियमितता आहे विरोधामध्ये आठ सदस्य असल्याने त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला गेल्यामुळे त्यांना विरोधकांची अडचण व्हायला लागली आहे पत्नी सरपंच असताना त्यांचे पती विनाकारण ग्रामपंचायत कारभारात दखल देत आहेत.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत यांनी 13 जुलैपासून ग्रामपंचायत मधील सर्व आठ सदस्य ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराविरुद्ध पंढरपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे सांगितले गेल्या सहा महिन्यांपासून घंटा गाडी ची मागणी करण्यात येत आहे गावातील गटारींची स्वच्छता केली गेलेली नाही पाणीपुरवठा आरोग्य साफसफाई यातील कोणतेही काम सुरळीतपणे केले जात नाही ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे सध्याचे ग्रामसेवक पद हे अतिरिक्त पद आहे त्यामुळे सदर चे ग्रामसेवक हे महिन्यातून एक ते दोन वेळाच करकंब ग्रामपंचायत मध्ये येतात त्यामुळे नागरिकांचे दाखले व इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे प्रोसिडिंग ची लेखी मागणी केली त्याप्रमाणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वरील आठ सदस्यांना प्रोसिडिंग देण्यात यावे असे आदेश दिले आहेत तरीपण सरपंचांनी प्रोसिडिंग दिले नाही जो निधी येतो आहे त्यात जनसुविधेतून दहा टक्के रक्कम भरून वाडीवस्तीवरती खर्च केला जात आहे पण गावातील दलित वस्ती गटार पाणीपुरवठा आरोग्य सुविधा विज यासाठी ग्रामपंचायत कडे पैसे नाहीत कोरोना काळामध्ये कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यात आली नाही.

        ग्रामपंचायत स्थापनेपासून कधीही वीज भरले नाही म्हणून सार्वजनिक पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा बंद नव्हता पण वीज बिल वेळेवर न भरल्याने पाणीपुरवठा व पथदिवे बंद पडले होते अजूनही काही ठिकाणी पथदिवे व पाणीपुरवठा यामध्ये अनियमितता आहे या भोंगळ कारभाराविरुद्ध आठ विरोधी सदस्यांनी ग्रामसेवक बीडीओ मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले पण त्या तक्रारीची कोठेही दखल घेतली गेली नाही फक्त तोंडी आश्वासनेच दिली गेली यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूराव शिंदे यांनी आपणही याआमरण उपोषणात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

            या सर्व गोष्टींचा विचार करून करकंब मधील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून करकंब ग्रामपंचायत मधील आठ विरोधी सदस्य 13 जुलैपासून पंचायत समिती पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसणार आहेत

Reactions

Post a Comment

0 Comments