Hot Posts

6/recent/ticker-posts

जि.प. सदस्या श्रीमती.स्वातीताई कांबळे यांचा नव्याने आणखी एक पदभार देऊन सन्मान

जि.प. सदस्या श्रीमती.स्वातीताई कांबळे यांचा नव्याने आणखी एक पदभार देऊन सन्मान




वाकी (कटूसत्य वृत्त):- जिल्हा शिक्षण समिती,जिल्हा आरोग्य समिती,जिल्हा नियोजन समिती,सोलापूर विद्यापिठाच्या सिनेट सदस्या अशा अनेक जबाबदारा-या पार पाडत असताना आता नव्याने *"महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदा व पंचायत समित्या राज्य संघटनेच्या जिल्हा सल्लागार पदी बिनविरोध निवड होणे ही बाब भाग्याची तर आहेच पण जणतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून केलेल्या कामाची पोहोच नक्कीच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तबद्ध व धोरणात्मक निर्णयामुळे जि.प.जवळा गटात अत्यंत वेगवान गतीने विकासाभिमुख कामे साकारत आहे. 
तालुक्याचे लाडके माजी आमदार मा.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळा गटाच्या जि.प.सदस्या आपल्या मतदार संघात अत्यंत वेगवान पद्धतीने विकासकामे हाती घेत आहेत.
जणतेने मतांच्या माध्यमातून दाखविलेला विश्वासास जणू विकासाभिमुख कामाने त्या पोहोचपावती देत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांची दरवेळी दखल घेताना अधोरेखित होत आहे. अत्यंत कार्यकुशल,अभ्यासू,मितभाषि असलेल्या स्वातीताई या त्यांचे बंधू गणेश कांबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतात.कामाचे चोख नियोजन, शिघ्र पाठापुरावा,आढावा आणि त्या कामाला अंतिम मुर्त स्वरुप या त्यांच्या हातोटीमुळे विकास कामाला गती मिळत असल्याचे जणतेतून बोलले जात आहे.
अशा या कर्मयोगी महिला जि.प.सदस्यांच्या  शिरपेचात आज आणखी एका पदाची जबाबदारी पडणे ही बाब निश्चितच भुषणावह आहे. समस्त वाकी व जवळा गटाच्या तमाम जणतेकडून सोशल मिडिया व इलेक्ट्रिक मिडियातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments