खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात वृक्षारोपणवृक्ष लागवडीची चळवळ गतिशिल होणे काळाची गरज : जयमालाताई गायकवाड


सांगोला (कटूसत्य वृत्त):- : तालुका प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत चाललेले जागतिक तापमान, घटत चाललेले पर्जन्यमान, आणि वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण तसेच अन्य समस्यावर नियंत्रण मिळवून पुन्हा एकदा धरतीमातेला हिरवा शालू नेसविण्यासाठी संपूर्ण राज्यभर आणि देशभर वृक्षलागवड चळवळ गतिशील होणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले. गुरुवार दि. 30 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर तसेच ग्रामीण भागात वृक्षलागवडीचा भव्य उपक्रम संपन्न झाला. शहरातील खडतरे गल्ली येथील उद्यानात वृक्षलागवड करताना त्या बोलत होत्या.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील महुद, खवासपुर, लोटेवाडी, अचकदानी, शिवणे, वाढेगाव, संगेवाडी, जवळा, आलेगाव, वाकी, अकोला, वाटंबरे, चिनके, लोनविरे, हातीद, सोनंद, घेरडी, हंगिरगे, पारे, आणि डिकसळ आदींसह अन्य गावात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्ष लागवडीची चळवळ व ती संवर्धित करण्याची जबाबदारी घेऊन सुप्रियाताई सुळे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सांगोला शहरातील वृक्ष लागवड करताना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, शहराध्यक्ष शुभांगीताई पाटील, नगरसेविका भामाताई जाधव, विधानसभा मतदार संघ अध्यक्षा सुचिता मस्के, मा. उपसभापती शोभाताई खटकाळे, जयश्री पाटील, मंगल खाडे, हसीना मुलाणी, चैत्राली बनकर, संगीता पाखरे, नगरसेविका पूजा पाटील, सुनीता खडतरे, शशिकला खाडे, शंकुतला खडतरे, नंदाताई खडतरे, कमल खडतरे, काजल खडतरे, उषाताई खडतरे आधी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे नगरसेवक सोमनाथ लोखंडे अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जयमालाताई गायकवाड म्हणाल्या, गेल्या काही वर्षात वेगाने घटत गेले पर्जन्यमान असो किंवा कोरोनासारख्या जागतिक महामारीत निर्माण झालेली ऑक्सिजनची टंचाई या सर्व समस्या दूर करण्यासाठी वृक्ष लागवड आणि लावलेल्या वृक्षांचे संवर्धन हा एकमेव उपाय उरला आहे. म्हणून येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित श्वास घेण्यासाठी तसेच जिला आपण आई म्हणतो त्या धरती मातेस नेहमीच हिरवा शालू नेसविण्यासाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षलागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. केवळ शहर आणि तालुक्यात वृक्ष लावून चालणार नाही तर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रणरागिनीनी घेतल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या या निर्णयाचे जयमालाताई गायकवाड यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सखुताई वाघमारे, शुभांगीताई पाटील, नगरसेविका सुनिता खडतरे, संगीता पाखरे आदींनी आपले विचार मांडत वृक्षलागवडी सारख्या अनोख्या चळवळीद्वारे संसदरत्न खासदार सुप्रिया ताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments