आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विषयक आढावा बैठक संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- खरीप हंगामाची पेरणी सध्या सुरू आहे शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी चे काम सुरू आहे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे,खते उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक असणारे योजनांना गती मिळावी यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी कृषी अधिकारी व कर्मचारी व कृषी निविष्ठा वितरक यांची आढावा बैठक सोमवार दि २८जून रोजी बचत भवन पंचायत समिती सांगोला येथे घेतली , बियाणे व खतांची उपलब्धता या बाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री विकास काळुंके यांनीमाहिती दिली,सूर्यफुलाची बियाण्याची उपलब्धता 156 क्विंटल असून चालू हंगामात सूर्यफुला कडे शेतकऱ्यांचा कल असल्यामुळे व प्रचंड मागणी असल्यामुळे बियाण्याची कमतरता असल्याचे सांगण्यात आले, तसेच इतर कोणतेही बियाणांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले रासायनिक खतांच्या बाबतीत, युरिया, याची उपलब्धता सांगण्यात आली व युरियाचा बफर स्टॉक 225 मेट्रिक टन वितरित करूनही कमतरता जाणवत आहे. यावर उपाय म्हणून उर्वरित बफर स्टॉक मधील युरिया वितरित करण्यासाठी परवानगी मागण्याची सूचना शहाजीबापू पाटील यांनी दिली,
तालुका कृषी अधिकारी श्री रमेश भंडारे यांनी चालू वर्षीचे पर्जन्यमान 141.70 मी मी असून महसूल मंडळ निहाय पर्जन्यमान सांगून पिकनिहाय पेरणी बाजरी 4598 हेक्टर, मका 1856हेक्टर, तूर 281हेक्टर, उडीद 116हेक्टर,सूर्यफूल 334हेक्टर, अशी एकूण 7346हेक्टर झाली असल्याचे सांगितले.
चालू हंगामासाठी कृषी विभागाने 31504हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत बाजरीचे पॉईंट 29.22 क्विंटल बियाणे वाटप परवाना द्वारे करण्याचे काम सुरू असल्याचे सांगतिले, ठिबक सिंचन अनुदान यासाठी 2393 लाभार्थ्याची निवड झाली असून 1116 लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली असून अनुदान वितरित करण्याचे काम सुरू आहे, अंतर्गत ट्रॅक्टर निवड 29 पूर्वसंमती 9 झाली आहे तसेच कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत ट्रॅक्टर व अवजारे अनुदान अंतर्गत 147 लाभार्थ्याची निवड झाली असून 55 शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली आहे, अंतर्गत फळबाग लागवड मध्ये 276 लाभार्थी 176.70हेक्टर साठी तांत्रिक मंजूरी असून फळबाग लागवडीचे काम चालू आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आढावा तसेच शेतकरी अपघात विमा योजनेचा ही आढावा घेतला, विस्तार विषयक जनजागृती मध्ये मक्यावरील लष्करी आळी डाळिंब पिकावरील मर रोग हुमणी,पेरणी,खत बचतीसाठी कृषक चा वापर याची माहिती या बैठकीत देण्यात आली,
आमदार शहाजीबापू पाटील यांनी पेरणीसाठी बियाणे खते याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी तसेच सध्याचे पेरणीची वेळ असल्याने सर्वांनी सतर्कतेने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या, यावेळी गट विकास अधिकारी संतोष राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, संजय देशमुख सर, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी निविष्ठा वितरक युनियनचे अध्यक्ष सचिव व इतर कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
आढावा बैठक संपल्यानंतर शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती सांगोला आवारामध्ये एक पद एक वृक्ष अभियाना अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली,
0 Comments