Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

          अकलूज (कटूसत्य वृत्त): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त व जागतिक पत्रकार दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा सन्मान सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकर नगर अकलूज यांच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

          सदरचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर सचिव राजेंद्र चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. कोरोना सारख्या महाभयानक अशा परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी वास्तववादी बातमीदारी करीत रोजच्या घडामोडी समाजासमोर आणल्या.!त्यांनी केलेल्या बातमीदारीला व पत्रकारांना प्रोत्साहन देत त्यांचा सन्मान करण्याचे कार्य सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज या संस्थेच्या वतीने करण्यात आले.यावेळी पत्रकार बांधवांचा सन्मान सचिव राजेंद्र चौगुले,प्रा.डॉ. इंद्रजित यादव, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी बोलताना सचिव राजेंद्र चौगुले यांनी संस्थे बद्दल माहिती दिली.तर पत्रकारांचा सत्कार केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments