विजयदादांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त सायकल रॉयडर्सची ७७ कि.मी.सायकल राइड
अकलूज (कटूसत्य वृत्त): शिवरत्न स्पोर्ट्स अकॅडेमी व रॉयल रायडर्स, अकलूज यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त ७७ की.मी सायकल राईड आयोजित करण्यात आली होती.
विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल अकलूज येथून पहाटे ५.०० सायकल राईडला सुरुवात होऊन पानीव, माळशिरस,कारखेल (वीर संताजी घोरपडे समाधी स्थळ ,माळशिरस,संग्रामनगर,सदुभाऊ चौक,विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज याठिकाणी सकाळी ११.०० वा.समारोप करण्यात आला.शिस्तबद्ध व कोरोना महामारीचे सर्व नियमांचे पालन करीत सायकल राइडर्सनी एकच ड्रेसकोड व हेल्मेट परिधान केले असल्याने मार्गावरील सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.समारोपा नंतर सायकल रॉयडर्सनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन विजयसिंह मोहिते-पाटील व सौ.नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.या ७७ कि.मी.च्या सायकल राइडसाठी रॉयल राइडर्सचे सर्वेसर्वा धैर्यशील मोहिते-पाटील,स्वरुपाराणी मोहिते-पाटील पुणे येथून बाबा बहिरे,उमेश गोलांडे,मालेश गावढे तर इंदापूर तालुक्यातून रमेश शिंदे,महिबूब बागवान यांच्यासह ७५ सायकल रॉइडर्स सहभागी झाले होते.
0 Comments