Hot Posts

6/recent/ticker-posts

कोविड मुक्त गावांना उत्कृष्ट गाव पुरस्काराने गौरविण्यात यावे - रोहन सुरवसे पाटील

कोविड मुक्त गावांना उत्कृष्ट गाव पुरस्काराने गौरविण्यात यावे - रोहन सुरवसे पाटील




पुणे (कटूसत्य वृत्त):-  राज्यातील व  ग्रामीण भागातील अनेक गावे कोविड मुक्त असतील अशा गावांना उत्कृष्ट गाव पुरस्कार देऊन संबंधित विभागाने गौरव करावा असे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की गेली दीड वर्ष महाभयंकर अशा कोरोना रोगाशी सर्वचजण कडवी झुंज देत आहेत.ही लढाई एका अदृष्य शक्ती बरोबर आहे.या लढाईत राज्यातील अनेक गावांनी अत्यंत पारदर्शकपणे व प्रमाणिकपणे लढा दिला आहे. कोरोना योद्धा गाव म्हणून अशा गावांचा सहभाग महत्वाचा आहे.आपले गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी अखंड गावानेच परिश्रम घेतले आहे.अशा गावांना प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे असे मला वाटते.आज एका गावाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर दुसरे गाव तयार होण्यास जास्त कालावधी लागणार नाही.आणि असे एका मागून एक गावे कोरोना मुक्त झाले तर राज्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होऊ शकते.म्हणून संबंधित विभागाने ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावांचा पुरस्कार देऊन गौरव करावा असे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments