अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मास्क आणि सॅनिटायझर चे होणार वाटप

श्रीनिवास दादा करे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सांगोला (जगन्नाथ साठे) :- राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीचे औचित्य साधून मायाक्का देवी दूध संकलन केंद्र मंगळवेढा रोड घेरडी येथे श्रीनिवास दादा करे मित्र मंडळाच्या वतीने सकाळी नऊ वाजता नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते श्रीनिवास दादा करे यांनी दिली. सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट भयंकर वेगाने पसरत असून नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा ,सॅनिटायझर चा आणि मास्कचा वापर केला तरी येणाऱ्या काळात तरी नागरिक सुरक्षित राहतील असा विश्वास श्रीनिवास करे यांनी व्यक्त केला.
घेरडी आणि परिसरातील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मास्क,सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात येईल असेही संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीनिवास करे यांनी केले आहे.
0 Comments