खबरदार ! या पुढे अवैध दारू विक्री कराल तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल--डीवायएसपी राजश्री पाटील

सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, पण कोरोनाच्या काळातील पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांवर कमी प्रमाणात कारवाई केल्या आहेत, पण यापुढे जर सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध दारू विक्री करताना आढळून आली तर दारू विक्री करणाऱ्यांवर सांगोला पोलिसांच्या कडून कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा सिंघम पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी दिला आहे.सांगोला शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे पोलिसांवर जादा ताण आला आहे. तरीही लॉक डाऊन च्या काळातील सांगोला पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे,असे नमूद करून त्यांनी सांगोला पोलिसांचे अभिनंदन केले.सांगोला तालुक्यातील महुद,घेरडी,एखतपुर,वाढेगाव,जुनो
येत्या काळात गावातील पोलीस पाटील आणि गाव विकासाचे स्वप्न करू पाहणाऱ्या नागरिकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची नावे पोलीस प्रशासनास कळवावी त्यांची नाव गुपित ठेवून असा अवैध दारू धंदा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी आणि पोलिसांना दिल्या असल्याची माहिती ही शेवटी राजश्री पाटील यांनी दिली.
अवैध दारू विक्री करून कुटुंबाची राख रांगोळी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. येत्या काही दिवसांत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर नक्कीच जरब बसेल यात शंका नाही.तशा सूचना प्रत्येक बीट अधिकारी आणि पोलिसांना दिल्या आहेत.
0 Comments