Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास यापुढे होणाऱ्या उद्रेकाला जबाबदार उपमुख्यमंत्री पवार, पालक मंत्री भरणे असतील-प्रभाकर देशमुख

राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास यापुढे होणाऱ्या उद्रेकाला जबाबदार उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री भरणे असतील - प्रभाकर देशमुख

निर्णय रद्द केल्याचा आदेश मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही - प्रभाकर देशमुख

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमांतुन शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आवाज ऊठवुन, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारे जनहितचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख लेखी आदेश आल्याशिवाय आंदोलनातुन माघार नाही हा ईशारा दिला आहे. पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत सर्व शेतकर्‍यांना सोबत घेऊन ठरवणार आहे.सध्या कोरोनाने कहर केला असुन माझा शेतकरी आंदोलन करण्याच्या विचारात असुनसुद्धा भितीपोटी थो सहभागी होऊ शकत नाही.परंतु शासनाने सोशल मिडीया वरून तोंडी आदेश देत लेखी आदेश जर प्रलंबित ठेवणार असतील तर सरकारच्या विरूध्द सोलापूर जिल्ह्यात जनआक्रोश ऊसळल्याशिवाय रहाणार नाही.याचीच प्रचिती म्हणजे पहिला उद्रेक माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे रात्री दहाच्या सुमाराला ाफेगाव च्या शेतकर्‍यांनी टायर पेटवून टेंभुर्णी- अकलूज रस्ता बंद केला होता त्यामुळे येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटल्या शिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला लवकर निर्णय जेव्हा लागेल अन्यथा जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.

          सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उजनी धरण भिमानगर येथे आंदोलनाचा तेरावा दिवस असून बेमुदत धरणे आंदोलन जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत पुढे सुरू राहणार असल्याचे जनहित संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख यांनी सांगितले असून अद्याप जरी आमच्या उपोषणाकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असले तरी सोलापूर जिल्ह्यातून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पाणी पळवणारे पालक मंत्री भरणे मामा यांच्याविरोधात जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही पाठीमागे सरकु नका आम्ही तुमच्या बरोबर आहे असे जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतीने आज ठराव दिले असून लवकरात लवकर निर्णय न झाल्यास सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक गावात होणारा उद्रेकाला जबाबदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री भरणेमामा असतील हे विसरू नये असा खणखणीत इशारा आंदोलन करतेवेळी प्रभाकर देशमुख यांनी दिला.

          आज टाकळी(टें), वडोली,उजनी (मा), पांढरेवाडी, कविटगांव या ग्रामपंचायतीनी ठराव दिले या आंदोलनास प्रहार शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना,संभाजी ब्रिगेड व बळीराजा शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे,रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील,विठ्ठल आबा मस्के,सचिन पराडे पाटील,रामदास खराडे, मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले, विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक, टाकळी पार्टीप्रमुख तानाजी सलगर,सरपंच हरि माने, वडोलीचे सरपंच भैय्या गाडे,भारत माने सर,औदुंबर घाडगे,उजनी (मा) सरपंच अविनाश निकम, शिवाजी जाधव, सदस्य बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, कुलदीप पाटील, अक्षय शिंदे, विष्णु तात्या बिचकुले, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments