Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळूचोरीवर मोहोळ पोलिसांची कारवाई 98 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाळूचोरीवर मोहोळ पोलिसांची कारवाई 98 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

          मोहोळ (कटुसत्य वृत्त): मोहोळ तालुक्यातील नरखेड एकुरके गावच्या शिवारात शासनाच्या विनापरवाना वाळू चोरी करून वाहतूक करताना पोलिसांची मोठी कारवाई यामध्ये 98 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक यांचे पथक नरखेड भागात पेट्रोलिंग करीत असताना रविवार दिनांक 23 मे रोजी दुपारी एक वा च्या सुमारास गोपनीय माहिती दार मार्फत माहिती मिळाली की स्मशानभूमी जवळ काही व्यक्ती विनापरवाना साठा केलेली वाळू भरत आहेत. 

          पोलीस पोहोचण्याची कुणकुण लागताच सदर ठिकाणातील आरोपी त्यांनी पळ काढला यावेळी सदर वाळूचा साठा कोणी केला वाहने आणि मशीन कोणाचे आहे याची चौकशी केली असता. १ ) विलास भीमराव ढेरे (रा. बोपले) २ ) अमोल भास्कर ढवन (रा. एकुरके) ३) सोमनाथ नागनाथ कोल्हाळ (रा. एकुरके) ४) उमेश भारत ढेरे (रा. बोपले), ५)निलेश उत्तम कोल्हाळ ( रा. एकुरके) अशी त्यांची नावे आहेत. त्या ठिकाणी कारवाई करून सहा ट्रॅक्टर ट्रॉली सह आणि एक जेसीबी आणि वाळू त्यासह 18 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला आहे. सदरची वाळू शासनाचे कोणत्याही परवानगीशिवाय रॉयल्टी न भरता घेऊन जात असताना मिळून आले सध्या कोरोना सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला आहे म्हणून मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          या कारवाईमध्ये मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर पोलीस कॉन्स्टेबल पोफळे, पोलीस नाईक घोळवे, चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवणे, पोलीस कॉन्स्टेबल पुजारी या पथकाने सदरची कारवाई केली
या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक पोपळे हे करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments