BREAKING सोलापूर ग्रामीण भागात 1137 कोरोना पॉझिटिव्ह,आज 17 मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे शनिवारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1137 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 57088 झाली आहे.
शनिवारी ग्रामीण भागातील 9337 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1137 पॉझिटिव्ह आहेत तर 8200 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 57088 झाली आहे.
आज तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1379 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 48309 जण घरी परतले आहेत. तर 7400 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments