घुलेंच्या शाही दरबार बियर बारला पोलिसांनी दाखविला हिसका,हॉटेल मालक फरार,मॅनेजर मात्र अटकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 26, 2021

घुलेंच्या शाही दरबार बियर बारला पोलिसांनी दाखविला हिसका,हॉटेल मालक फरार,मॅनेजर मात्र अटकेत

 घुलेंच्या शाही दरबार बियर बारला पोलिसांनी दाखविला हिसका,हॉटेल मालक फरार,मॅनेजर मात्र अटकेत 




सांगोला (कटूसत्य वृत्त):- " सध्या सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे . महाराष्ट्र शासनाकडून , जिल्हा अधिकाऱ्याकडून , सांगोला पोलीस स्टेशनकडून लॉकडाऊन चे नियम पाळण्याबाबत वेळोवेळी सुचना करण्यात आलेल्या आहेत . तरीही लोक त्या सुचनांचे पालन करत नाहीत . सांगोला पोलीसांनी वेळोवेळी मास्क न वापरणे , विनाकारण फिरणारे , सोशल डिस्टनस न पाळणारे , दुकाने निर्धारित वेळेत चालु न ठेवणारे अशा लोकांवर व संस्थेवर कारवाई करून दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली आहे . तसेच वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत . दुकाने सिल करण्यात आलेली आहेत . तसेच नियम न पाळणाऱ्यावर ही गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे . लग्न सोहळयामध्ये २५ पेक्षा जास्त लोक जमल्यामुळे त्याच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत . अशा प्रकारे सांगोला पोलीसांनी कारवाई करूनही लोकांच्यात फरक पडत नाही .दि . २४ एप्रिल रोजी संध्याकाळी पो.नि. भगवान निंबाळकर यांना गुप्त बातमी मिळाली की , जवळा येथील शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , हे हॉटेल दिवसा ढवळया उघडे ठेवुन दारूची विक्री करत असल्याबाबत माहीती मिळाली होती. तात्काळ पो.नि. निंबाळकर व इतर कर्मचाऱ्यासह सायं साडे सहा वाजता  त्या ठिकाणी छापा टाकला असता . सदर ठिकाणी हॉटेल शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , जवळा चे मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे रा . आलेगाव ता . सांगोला हे दारूची विक्री करत असताना आढळून आले . लागलीच दोन पंचा समक्ष पंचनामा करून हॉटेल शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , जवळा हे पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आले व हॉटेल मालक इंद्रजित तानाजीराव घुले रा . जवळा ता . सांगोला व हॉटेलचे मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे रा . आलेगाव ता . सांगोला यांचेवर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून हॉटेल मॅनेजर यास अटक करण्यात आलेली असुन हॉटेल मालक हे फरार आहेत . सदर कारवाई पो.नि. भगवान निंबाळकर , स.पो.नि. यमगर , पोहेकॉ / १२४२ बनसोडे , पोना / १६८२ मोहोळकर , पोकॉ / ६ ९ ० काळेल , पोकॉ / २२०६ चोरमुले व पोकॉ / १ ९ ७४ देशमुख यांनी केलेली आहे .
      पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते  की , जर शासनाचे नियम पाळले नाही,मास्क वापरले नाहीत , तर दंड आकारला जाईल . विनाकारण फिरणा -यांची वाहने जप्त करण्यात येतील , निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान , परमिटरूम , बिअर बार उघडे ठेवल्यास सील केले जातील , लग्न सोहळयात २५ पेक्षा जास्त लोक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जाईल व मंगल कार्यालयावर पन्नास हजार दंड आकारला जाईल , अशा प्रकारे सांगोला पोलीस ठाणे कडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages