Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे वाळू चोरी वर पोलिसांनी कारवाई करून ट्रॅक्टर यारी असा ७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

 मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे वाळू चोरी वर पोलिसांनी कारवाई करून ट्रॅक्टर यारी असा ७ लाखाचा  मुद्देमाल हस्तगत



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सीमा नदीकाठ भागातील वाळू चोरी वर धडक कारवाई करण्याच्या सूचना डीबी पथकाला दिल्या त्यानंतर कारवाई पथकाने केलेल्या  कारवाई  मध्ये मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मोहोळ पोलिसांनी कारवायांमध्ये ट्रॅक्टर आणि यादी असा सात लाख पन्नास हजाररुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वा चे सुमारास घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सात एप्रिल रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस पो कॉ. हरिदास थोरात, पो.कॉ. बोधले यांच्या पथकाला माहिती मिळाली, सीना नदीच्या पात्रातून एका ट्रॅक्‍टर व यारी यांच्या मदतीने दोन इसम नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे ते दिसून आले यावेळी पोलीस कारवाईला ट्रॅक्टर जवळ पोहोचेपर्यंत चालकाने ट्रॅक्टर जोराने चालवून नदीकाठच्या झाडाचा फायदा घेत पळून गेला यावेळी ट्रॅक्टर कोणाचा आहे अशी चौकशी केली असता ट्रॅक्टर मालकाचे नाव राजाभाऊ श्रीरंग डोके रा.डोके वस्ती मोहोळ चालक ट्रॅक्टर जागीच सोडून पळून गेला. याप्रकरणी अज्ञात चालकावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

यानुसार मोहोळ तालुक्यातील घाटणे ते झालेल्या कारवाई मध्ये  ट्रॅक्टर आणि यादी  7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना विजयकुमार माने हे करीत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments