Hot Posts

6/recent/ticker-posts

निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊन करत सरकारने जनतेची फसवणूक केली - धैर्यशिल मोहिते पाटील

 निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊन करत सरकारने जनतेची फसवणूक केली - धैर्यशिल मोहिते पाटील 


अकलूज (कटूसत्य वृत्त):- कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक दी चेन म्हणत कडक निर्बंधाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत लाॅकडाऊनच लावले आहे त्यामुळे लहान व्यावसायिक ,व्यापारी, शेतकरी आणि सामान्यांमध्ये एक कमालीची अस्वस्थता आहे, त्यामुळे हे निर्बंध मागे घेऊ तात्काळ नव्याने अधिसूचना जाहीर करण्याची मागणी धैर्यशिल मोहिते पाटील यांनी केली आहे .
 पुढे मोहिते पाटील म्हणाले हेअर सलून,टपरी धारक, चहा कॅन्टीन, पानटपरी, खेळणी दुकान, कापड दुकान, भांडी दुकान, बाजार,भाजी मार्केट, हाॅटेल रेस्टॉरंट, ब्युटी पार्लर, इत्यादी सर्व दुकाने सुरू करावीत अशी मागणी करत या व्यावसायिक व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला आहे.
सर्वच दुकानांचे व्यावसायिकांचे अर्थकारण कोसळले असताना नव्याने जारी केलेल्या लाॅकडाऊन मध्ये  व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज व त्यांचे हप्ते थकीत लाईट बिल, दुकानातील कामागाराचा पगार, घरप्रपंच, मासिक खर्च सुद्धा त्यांना भागविणे अशक्य होत आहे. हा खर्च भागवण्यासाठी सुद्धा पुन्हा व्यापारी व्यावसायिकांना कर्जच काढावी लागत आहे. त्यामुळे हा नवीन निर्बंधरूपी लाॅकडाऊन व्यापाऱ्यांसाठी जीवघेण्या संकटा पेक्षा कमी नाही. माणूसकीच्या दृष्टीकोनातून व्यापारी व्यावसायिकांचा विचार राज्य सरकारने करायला हवा.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या एक वर्षापासून आहे. कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर सक्षम अरोग्य यंत्रणा उभी केली पाहिजे. निर्बंधाच्या नावाखाली दिशाभूल करत शेतकरी, व्यापारी व्यावसायिकांवर लाॅकडाऊन लादून कोरोना कमी होणार नाही हे शासनाने लक्षात  घ्यायला हवे. छोटो मोठे व्यावसायिक व्यापारी , शेतकरी व जनसामान्यांचे हीत लक्षात घेऊन नवीन अधिसूचना जारी करावी अशी मागणी मोहिते पाटील यांनी केली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments