आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोग्य यंत्रणा उभारणीवर भर
बार्शी (कटूसत्य वृत्त): सध्या सर्वत्र कोरोनाचा प्राधुरभाव दिवसेंदिवस वाढत आहे.वाढती रुग्ण संख्या मुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड मिळत नसल्या मुळे मृतांची संख्या वाढत आहे. अशा परिस्तिथीत बार्शी तालुक्यातील हॉस्पिटल वर प्रचंड ताण पडत आहे. बार्शीत सध्या जगदाळे मामा हॉस्पिटल, सुसृत हॉस्पिटल,कॅन्सर हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरु आहेत. बार्शी तालुका व आजूबाजूच्या पाच सहा तालुक्यातील रुग्णाचा भार या सेंटर वर पडत आहे त्यामुळे आणखी दोनशे बेड ची आवश्यकता शहरात आहे. याचमुळे आणखीन बेड उपलब्ध करण्यासाठी सध्या बार्शीचे आमदार शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बार्शीतील जुने जवाहर हॉस्पिटल हे एक वर्षा साठी खाजगी सुविधा हॉस्पिटल ला हस्तांतरित करून तिथे पन्नास बेड चे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असून,पन्नास पैकी तीस बेड हे ऑक्सीजन बेड असणार आहेत त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.या संबंधीची एक बैठक नुकतीच आमदार राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. त्या बैठकीला, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी, मुख्याधिकारी अमित दगडे पाटिल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शीतल बोपलकर, सुविधा हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश बुरगुटे,डॉ. कैवल्य गायकवाड हे उपस्तिथ होते.
ग्रामीणभागातून येणाऱ्या रुग्णांची सोय त्या त्या गावातच व्हावी या उद्देशाने पांगरी येथे देखील शंभर खाटांचे कोविड सेंटर चालू करण्यात आले असून तेथे देखील जिल्हा परिषद शाळेत पन्नास बेड चे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून ग्रामीण रुग्णालयात वीस ऑक्सीजन बेड उपलब्द आहेत.तेथील परिस्तिथीची पाहणी करण्यासाठी आज आ. राऊत यांनी पांगरी ला भेट दिली व तेथे येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा केली. यावेळीही त्यांच्या सोबत प्रांताधिकारी निकम साहेब, पंचायत समिती सभापती अनिल डिसले,तहसीलदार शेरखाने हे उपस्तिथ होते. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत यांनी सांगितले कि कोरोना चा वाढता संसर्ग पाहता शहर व तालुक्यात आणखी बेड उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.जेणे करून प्रत्येक भागातील रुग्णाला त्याच ठिकाणी उपचार मिळतील व यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
0 Comments