Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साध्या पद्धतीने साजरी

मोहोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साध्या पद्धतीने साजरी

          मोहोळ (कटुसत्य वृत्त): मोहोळ तालुक्यात कोरोनाचे नियम पाळत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरी झाली. यावेळी मोहोळ शहरासह तालुक्यातील अनेक गावात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

          मोहोळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक येथे भीम अनुयायांनी कोरोनाचे नियम पाळत अभिवादन केले. याठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे निरंजन क्षीरसागर, रिपाईचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष हणमंत कसबे, वकील संघटनेचे अँड. नागेश साबळे, पत्रकार संघटनेचे संजय आठवले, पीपल्स रिपब्लिकन फ्रंटचे राज्य अध्यक्ष धनंजय आवारे तसेच विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी येथील चैत्य स्मारकातील अस्थीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

          मोहोळ मधील चाटी गल्ली येथे आर. पी. आय. शहर अध्यक्ष राहूल तावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते अमोल महामुनी यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दादा बोराडे, उमेश गोटे, अंबादास पवार, धनंजय गोटे, संदिप दिक्षित, मोहन पिलिवकर, सदाशिव निस्ताने, जितेंद्र तुपसमिंदर, कुंडलिक चव्हाण आदी उपस्थित होते.

          देगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त नरखेड बीट औटपोस्टचे बीट अंमलदार गणेश पोफळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काकासाहेब पाटील, भिमयुवा प्रतिष्ठानचे गणेश सिरसट, राजेंद्र सिरसट, संतोष सिरसट, गोवर्धन जौजट, कालीदास रणदिवे, आनंद सिरसट, सागर सिरसट, महेंद्र जौजट, आदित्य जौजट, सोमनाथ सिरसट, रामचंद्र जौजट, समाधान रणदिवे आदी उपस्थित होते.

          येवती येथील ग्रामपंचायत कार्यालयात आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच भाग्यश्री खुर्द यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच आनंद पाटील, माजी सरपंच विक्रम सिंह पाटील, रिपाईचे तालुका संघटक दत्ता गाडे, राष्ट्रवादी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष धनाजी गोडसे, राजू पाटील, गणेश पाटील, ग्रा प सदस्य सुधाकर काळे, शरद गोडसे, भाग्यश्री खंदारे, परमेश्वर गाडे, शरद गाडे, आदेश सरवदे, कृष्णा गाडे आदी उपस्थित होते.

          भोयरे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारत कसबे, आदित्य कसबे, जयशिंग कसबे, प्रकाश गाजघाटे, नवनाथ सुतार, मंथन कसबे, निलेश गाजघाटे, सयाजी कसबे आदी उपस्थित होते.

          कामती बु येथे धम्मदीप समाजसेवा मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन सपोनि अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन गायकवाड, यशवंत बाबरे, सारंग गायकवाड, बंडू गायकवाड, व धम्मदीप समाजसेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments