भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्षपदी शशिकांतभाऊ देशमुख यांची नियुक्ती
सांगोला (कटूसत्य वृत्त): भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री डाॅ.अनिल बोंडे यांनी शशिकांतभाऊ देशमुख यांची भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.
सांगोला तालुक्यातील जवळा गांवचे सुपूत्र व मुंबई शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांनी यापूर्वीही भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी बजावली असून तरुण वर्गाला भाजपाच्या कार्यप्रणालीचे महत्व पटवून त्यांना भाजपवासी करुन घेण्यात शशिकांतभाऊ देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली त्यांचे धाकटे बंधू श्रीकांतदादा देशमुख हे ही भाजपाचे सोलापूर जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांना चांगले परिचित असून ही दोन्ही भावंडे भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
शशिकांतभाऊ देशमुख यांच्या कार्याची चुणूक पाहूनच किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डाॅ.अनिल बोंडे यांनी त्यांची किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असल्याचे पत्र भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी दिले आहे.
शशिकांतभाऊ देशमुख यांची भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष पदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments