Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग १७ मध्ये आतापासूनच मेजर तानाजी माने यांचे जनसंपर्काचे पारडे जड

 प्रभाग १७ मध्ये आतापासूनच मेजर तानाजी माने यांचे जनसंपर्काचे पारडे जड

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक समर्थक आग्रही
पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष




मोहोळ (कटुसत्य वृत्त):-येत्या मे महिन्यात पार पडणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्या वर्षभरापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या प्रभागातून मेजर तानाजी माने यांनी रीतसर आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी माजी आमदार राजन पाटील, युवा नेते बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रभागातून उमेदवारीची संधी देण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रभागात विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असलेल्या मेजर माने यांच्या उमेदवारीसाठी प्रभागातील स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्ते आग्रही आहेत. राष्ट्रवादी पक्षाने या प्रभागातून मेजर माने यांनाच उमेदवारी द्यावी या मागणीचे शिष्टमंडळ देखील अनगरला जाऊन पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांना भेटून आले आहे. प्रभागातून मेजर तानाजी माने यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून इतर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मनमोकळा माणुसकीचा स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आणि निगर्वी व्यक्तिमत्व असलेले मेजर तानाजी माने हे या प्रभागातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतरही सर्वपक्षीय मतदार बांधवांनी मेजर तानाजी माने यांच्या संभाव्य उमेदवारीला आतापासूनच पाठिंबा दिल्याने सध्या या प्रभागात मेजर तानाजी माने यांचे पारडे आता आणखी जड होताना दिसत आहे.
दूध व्यवसायाच्या माध्यमातून प्रभागातील हजारो नागरिकांशी जनसंपर्क असलेल्या माने परिवाराने आजवर प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. आजवर प्रभाग क्रमांक १७ च्या राजकीय वाटचालीमध्ये माने परिवाराची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे आता हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर तानाजी माने यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रभागातील नागरिकातून मोठा पाठिंबा व्यक्त केला जात आहे. सर्वांना सहज उपलब्ध होणारा नगरसेवक मेजर माने यांच्या रूपाने प्रभागाला मिळू शकतो. या शिवाय प्रभागातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकासाची कामे माने यांच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागतील असा विश्वास त्यांना पाठिंबा देणाऱ्या समर्थकांना वाटत आहे.
मेजर तानाजी माने यांचे चिरंजीव तथा युवा उद्योजक किरण माने यांनी प्रभागातील जनसंपर्क गेल्या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढवून पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासाची विचारधारा घरोघरी पोहोचवली आहे. याशिवाय प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याची भूमिका असलेला माने परिवाराची उमेदवारी या निवडणुकीत सरस ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून माने यांच्या नावाचा विचार व्हावा यासाठी प्रभागातील राष्ट्रवादीचे अनेक समर्थक प्रयत्नशील असल्याचे जाणवत आहे. मेजर तानाजी माने यांच्या मागे असलेला सर्वसामान्यांचा पाठिंबा नक्कीच त्यांना विजयापर्यंत सहज पोहोचवु शकतो. इलेक्टिव्ह मेरीटच्या अंदाजामध्ये सध्या मेजर तानाजी माने हेच सर्वात पुढे असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे यापूर्वी हा प्रभाग बालेकिल्ला असलेल्या भाजपच्या गोटात अस्वस्थता जाणवत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments