Hot Posts

6/recent/ticker-posts

उमेदवारी मिळो अथवा न मिळो नगरपरिषद निवडणूक लढवणारच..

 उमेदवारी मिळो अथवा न मिळो नगरपरिषद निवडणूक लढवणारच..

भावी नगरसेवक लखन कोळी यांची घोषणा कोळी यांची प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असल्यामुळे प्रभागातील  मित्र परिवाराची इच्छा होती की मी राजकीय क्षेत्रात प्रवेश करावा. प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे राजकीय क्षेत्रातील पदार्पण कधी आणि झाले हे मलाही समजले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेने आजवर काम करत आलो आहे. गत नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाने दिलेला उमेदवार निवडून यावा यासाठी सक्षम प्रचार यंत्रणा राबवली.नगरसेवकपदाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीची रीतसर मागणी केली आहे. जरी पक्षाने मला उमेदवारी नाही दिली तरीही मला प्रभागातील सर्वसामान्यांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरावेच लागेल. त्यामुळे या निवडणुकीत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही. मी येत्या काळात होणारी नगरपरिषद निवडणूक लढवणारच आहे अशी घोषणा प्रभाग क्रमांक 14 मधील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आणि येत्या काळातील अपक्ष उमेदवार लखन कोळी यांनी केली.
 वास्तविक पाहता हा प्रभाग गेली अनेक वर्ष विरोधी पक्षाच्या ताब्यात होता. तरीही आमच्या या प्रभागात राष्ट्रवादीची विचारधारा तळागाळात रुजवली. त्यामुळे या ठिकाणी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये माझा आणि माझ्या मित्रपरिवाराचा किती वाटा आहे ? हे पक्षश्रेष्ठींना देखील माहिती आहे. माझी लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसुन विकासाच्या बाजूसाठी असणार आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून प्रभागासाठी झटत आलो आहे त्यामुळे माझ्या आजवर केलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती नक्कीच मतदार बंधू भगिनी मला देतील असा विश्वास वाटतो त्यामुळेच या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरून निवडणूक लढवणार आहे.
गत नगर परिषद निवडणुकीत मोठ्या विश्वासाने पक्षाने दिलेला उमेदवार आम्ही सर्वांनी निवडून दिला. मात्र त्यांनी आमच्या विकासाच्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांना विजयी करणार्‍या आम्हा सर्वांना प्रभागातील सर्वसामान्य जनतेचा रोष पत्करावा लागला. त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही अपक्षपणे ही निवडणूक लढवून सर्वसामान्यांच्या विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरावेच लागेल. त्यामुळे मी हि निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे.आमच्या प्रभागातील जनसंपर्काचा पहिला टप्पा यापूर्वीच मी पूर्ण केला असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील भेटीगाठी आणि जनसंपर्क अभियान सुरू आहे. यामध्ये मला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे माझ्या सक्षम प्रचार यंत्रणेसाठी प्रभागातील माझा मित्रपरिवार अहोरात्र मेहनत घेत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments