मोहोळ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून आंदोलन

मोहोळ (कटुसत्य वृत्त):-मोहोळ नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होवुन पहिला टप्पा काळ्या फिती लावून कामकाज करण्याचे आंदोलन राज्यातील नगर परिषदा नगर पंचायती मधील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अडचणी व प्रश्नासाठी कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक १ / ४ / २०२१ रोजी नगर परिषद मोहोळ समोर महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी,संवर्ग कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने मा विश्वनाथजी घुगे सो व मा रामेश्वरजी वाघमारे पुणे विभागीय अध्यक्ष मा. अनिल पवार यांचे नेतृत्वात महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी,कामगारांच्या न्याय हक्कासाठी 1 मे 2021 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि 1.4.2021 रोजी काळीफीत लावुन कामकाज करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने पुणे विभागीय उपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात आज काळ्या फिती लावून परिषदेचे कामकाज सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यात आला आहे त्याअनुशंगाने महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी,संवर्ग कर्मचारी कामगार संघटना मोहोळ जि सोलापुर च्या वतीने द्वारसभा घेण्यात आली असता मोहोळ न.प चे सुवर्णा हाके अमित लोमटे राजेंद्र सपाटे, महेश माने रोहीत कांबळे राजू शेख संगीता कुंभार श्रावण कसबे दिलीप देशमुख कोंडीबा देशमुख बालाजी काटकर संगीता बोराडे निरंजन क्षीरसागर सादिक सुर्की इ .कर्मचारी,अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments