विजेचा पाण्याचा प्रश्न काही क्षणात मार्गी
ट्रान्ससफार्मर आणि बोअर घेऊन सर्वसामान्यांना दिला दिलासाराष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सुदर्शन गायकवाड प्रभाग ११ मध्ये बनले लोकप्रिय


मोहोळ (कटुसत्य वृत्त):- ज्या प्रभागात मी लहानाचा मोठा झालो त्या प्रभागातील समस्या राजकीय माध्यमातून सोडवण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रभागातील माझा वाढता जनसंपर्क आणि मी सोडवत असलेले सर्वसामान्यांचे प्रश्न याची दखल प्रभागातील जनता आणि पक्षश्रेष्ठी नक्की घेतील आणि मला उमेदवारी देऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी देतील असा विश्वास प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार उद्योजक सुदर्शन भाऊ गायकवाड यांनी व्यक्त केला.
माझा जनसंपर्क आणि प्रचाराचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समस्या जाणून घेत आहे. प्रश्न मग तो विजेचा असो पिण्याच्या पाण्याचा असो अथवा रस्त्याचा असो तो कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे. आजवर राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल पक्षश्रेष्ठी नक्कीच घेतील आणि मला उमेदवारी देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसामान्य जनता गेल्या अनेक वर्षापासून रस्ते पाणी आरोग्य या समस्येशी अत्यंत कठीण परिस्थितीत तोंड देत आहे. जरी हा प्रभाग शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असला तरी या बालेकिल्ल्याला म्हणाव्या तशा सुविधा देण्यामध्ये या पक्षाला अपयश आल्यामुळे या पुढील काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून या भागातील प्रमुख्याने रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी मी वचनबद्ध राहणार आहे. वर्षानुवर्ष रखडलेले रस्ते पाणी आरोग्य समस्या सोडवण्यासाठी या प्रभागातून निवडणूक लढवण्याचा माझा मनोदय आहे. येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत या प्रभागातील रस्ते हाच कळीचा मुद्दा राहणार असून सर्वसामान्यांना यापुढील काळात रस्त्यासाठी अजिबात झगडावे लागणार नाही असेही यावेळी सुदर्शन भाऊ गायकवाड म्हणाले. प्रभागात वीज पाणी रस्ता याबाबतचा कोणताही प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बस माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी गायकवाड यांनी केले.
मोहोळ शहराच्या उत्तर भागात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा प्रभाग ओळखला जातो. या प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य या समस्या गेल्या पाच वर्षापासून आजही कायम आहेत. त्यामुळे सुदर्शनभाऊ गायकवाड यांनी या प्रभागातील प्रलंबित असणारे सर्व प्रश्न शासन दरबारी नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा महत्व निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी निश्चितीपूर्वीच सुदर्शन गायकवाड यांनी प्रभागातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवून सर्वसामान्यांच्या मनात विकासाबद्दल आश्वासक चित्र निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मुसंडी मारत जनसंपर्क वाढल्याने या प्रभागातील निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
0 Comments