Hot Posts

6/recent/ticker-posts

शेरे टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त 71 फाउंडेशनच्या वतीने टिपुसुलतान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न

 शेरे टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त 71 फाउंडेशनच्या वतीने टिपुसुलतान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न 


मोहोळ (कटुसत्य वृत्त):-
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोहोळ येथे 71 फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जिब्राईल भाई शेख यांनी  टिपू सुलतान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा वर्ष 5 वे आयोजित  केली होती. या स्पर्धेसाठी 6 संघादरम्यान लीग मॅचेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पेनूर गावचे दोन संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सागर मास्तर चवरे (गोल्डन मॅन ), व गिरीश अण्णा गवळी यांच्या संघांचा समावेश होता. तर मोहोळ मधील चार संघ देखील सहभागी झाले होते. त्यामध्ये सचिन शास्त्री यांचा आरोग्यम, रमेश बारसकर यांचा वन मॅन शो, एजाज तलफदार आणि रणजित गायकवाड यांचा संघ असे चार संघ होते.या पार पडलेल्या स्पर्धेमध्ये पेनूरच्या सागर मास्तर गोल्डन मॅन च्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला. तर सचिन शास्त्री यांच्या आरोग्यम संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे रणजित गायकवाड आणि एजाज तलफदार यांच्या संघाने पटकवला.
 या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये 21000 चे बक्षिस आमदार यशवंत माने यांच्या तर्फे  व ट्रॉफी महामूद इनामदार यांच्या तर्फे देण्यात आली. तर द्वितीय क्रमांक  रुपये 11000 इलीयास शेख, जयवंत गुंड, बंडू देसाई, माजिद सय्यद यांच्या तर्फे व ट्रॉफी लखन कोळी यांच्या तर्फे  देण्यात आली. तर तृतीय क्रमांक 7000 सुशील भैया क्षीरसागर (नगरसेवक )यांच्या तर्फे  व ट्रॉफी राष्ट्रवादीचे युवा नेते सुदर्शन गायकवाड (जिल्हा अध्यक्ष छावा संघटना )यांच्या तर्फे आणि चतुर्थ क्रमांक  रुपये 5000 प्रमोद बापू डोके (उपनगराध्यक्ष )यांच्या तर्फे  व ट्रॉफी मा.सत्यवान देशमुख (नगरसेवक )यांच्या तर्फे रोख देण्यात आली.व पाचव्या संघांसाठी संतोष वायचळ (नगरसेवक )यांच्या तर्फे व सहाव्या संघांसाठी मोरे मंडप व सौदागर साउंड यांच्या तर्फे देण्यात आली. व स्पर्धेसाठी इतर बक्षिसेही देण्यात आली. अंतिम सामन्यानंतर जिब्राईल भाई शेख 71 फाउंडेशन  यांनी सर्व मोठे व इतर बक्षीसे देणाऱ्यांचे व प्रेक्षक वर्गाचे तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सामना समिती जुबेर भाई शेख अशपाक मिर्झा मन्सूर इनामदार इम्रान मुजावर आश्रम सुरखी वाजिद शेख इत्यादी अभिमान आणि खेळाडूंनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.या बक्षीस वितरण कार्यक्रम समारंभासाठी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, पत्रकार साहिल शेख, युवा नेते लखन भाऊ कोळी जहांगीर बागवान युवा नेते सुदर्शन भाऊ गायकवाड, बिलाल शेख, हुजेफ शेख, दादा ओहोळ, सुरज तलफदार, बंडू मोरे, अण्णा सरवदे, शंकर पवार, नितीन गायकवाड, अभय उन्हाळे,आप्पा सरक इत्यादी सह शहरातील अनेक मान्यवर आणि तालुक्यातील खेळाडू उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments