सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त): येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दि . २५/०३/२०२१ ते दि . ३१/०३/२०२१ या कालावधीमध्ये मौजे यशवंतनगर – अकलूज येथे महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभागाने घालून दिलेल्या सर्व सूचना , अटी व नियमांचे पालन करून संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . इंद्रजीत यादव यांनी दिली . सदर शिबीरामध्ये स्वच्छता अभियान व कोव्हीड –१ ९ च्या प्रबोधनावर भर देण्यात आला . सदर शिबीराची दि . ३१/०३/२०२१ रोजी सांगता झाली . सदर निरोपसमारंभाच्या कार्यक्रमासाठी दुरदर्शन सहयाद्री वाहिनीचे मुलाखतकार अक्षय बनकर हे अध्यक्ष म्हणून तसेच डॉ . डी . एस . गेजगे ( प्राचार्य समीर गांधी महाविद्यालय , माळशिरस ) व डॉ . चंकेश्वरा लोंढे ( राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक , माळशिरस ) हे लाभले.
अक्षय बनकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे महत्वाचे व्यासपीठ असल्याचे नमूद केले . तसेच कोव्हीड -१ ९ च्या परिस्थितीमध्ये महाविद्यालयाने विशेष श्रमसंस्कार शिबीर घेवून त्यामार्फत समाजप्रबोधनाचे कार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले . त्यानंतर डॉ . डी . एस . गेजगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही लहान मोठी नसून सर्वजण स्वयंसेवक असतात . तसेच या योजनेमध्ये काम करणा - या प्रत्येक व्यक्तींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक करण्याचे काम हे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केले जाते . त्यानंतर डॉ . चंकेश्वरा लोंढे यांनी युवकांच्या जिवनातील राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले .
0 Comments