डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयतीनिमित्त रक्तदान शिबिर
अकलूज (कटूसत्य वृत्त): देशात कोरोना रोगाच्या महामारीने पुन्हा जोर धरला आहे.त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने महामानवांंच्या जयंतीला DJ लावून वायपट खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवण्याचे धोरण युवासेना अकलुज शहराच्या वतीने शहरप्रमुख शेखर भैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करून राबवले.
11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती व 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने 80 % समाजकारण 20 % राजकारण शिवसेनेच्या या तत्वानुसार युवासेना अकलुज शहराच्यावतीने शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलुज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये युवासेनेच्या वतीने खिलारे यांच्या आवाहानास प्रतिसाद देऊन ब्लड बँक अकलुज येथे 51 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला व रक्तदान केले. सहभागी युवक शिवराम गायकवाड, बच्चन साठे, अविनाश सोनवणे, रोहित भोरकाडे मनोज जगतात, प्रीतम साळवे, चिंतामणी गायकवाड, समाधान साळुंखे, सागर जगदाळे युवासेनच्या वतीने सहभागी युवकांचे व ब्लड बँक कर्मचारी यांचे विशेष आभार मानण्यात आले.
0 Comments