मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्यासाठी 6 व 7 मार्च रोजी विशेष शिबिराचे आzयोजन
पुणे (कटुसत्य वृत्त ) :- जिल्हयातील विधानसभा क्षेत्रातील सर्व निर्धारित स्थळे, मतदान केंद्रांवर शनिवार दिनांक6 व रविवार दिनांक 7 मार्च या सुट्टयांच्या दिवशी e-EPIC डाऊनलोड करण्याबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
e-EPIC डाऊनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहायता ॲपद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांनी त्यांचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अशा सर्व मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
0 Comments