युवकावर बलात्कार व अँट्रासिटी तर अकलुज ग्रामपंचायत महिला सदस्यावर खंडणीसह अँट्रासिटी गुन्हा दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त) :-लॉकडाऊन काळात मंदिरामध्ये लग्न करुन सुमारे वर्षानंतर लग्न झालेच नाही असे म्हणणार्या चोवीस वर्षीय युवकावर बलात्कार व अँट्रासिटी तर त्याच प्रकरणात अकलुज ग्रामपंचायत महिला सदस्या ज्योती कुंभार यांचेवर खंडणीसह अँट्रासिटी गुन्हा दाखल होवुन २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
याविषयी अकलुज पोलीसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार १९ वर्षीय पिडीत युवती ही नर्सिंंगच्या शिक्षणासाठी आली होती.या मागासवर्गिय मुलीसोबत वेळोवेळी शरीर संबध ठेवुन एकत्र राहण्यास नकार दिल्यामुळे अक्षय धनाजी शिंदे रा.लवंग (वय २४) यांचेवर पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अकलुज पोलीस ठाण्यात बलत्कार व अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झालला आहे.आरोपीस माळशिरस न्यायालयाने २२ मार्च पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यातील आरोपी अक्षय धनाजी शिंदे रा.लवंग हा अकलुज येथिल खडतरे लँब मध्ये कामास होता.तर पिडीत मुलगी ही बाहेरगावहुन अकलुज येथे नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी आली होती व एका खासगी हाँस्पिटलमध्ये पार्ट टाईम नर्स म्हणून काम करत होती. अक्षय धनाजी शिंदे हा खासगी हाँस्पिटलला लँबच्या तपासणीचे नमुने आणण्यासाठी नेहमी जात होता यातच त्याची पिडीत मुली सोबत ओळख झाली होती. ओळख वाढत गेल्यानंतर शिंदे यांने पिडीत मुलीची जवळीक वाढवली व माझे तुझ्यावर प्रेम आहे , आपण लग्न करुया अशी मागणी घातली.पिडीतेचा होकार मिळाल्यानंतर अक्षय शिंदे यांने आपण लग्न करणारच आहोत तर आपण शरीर संबध ठेवुया अशी मागणी केली त्यावर पिडीतेने नकार देत आधी लग्न करुया मगंच शरीर संबध ठेवुया असे सांगितले. यावर आरोपीने गोड बोलुन पिडीते सोबत अकलुज येथे नवीन बस स्थानक मागे राहत असलेल्या रुमवर, सुरज लाँज या ठिकाणी वेळोवेळी शरीर संबध ठेवले.त्यानंतर पिडीत ही आपल्या गावी गेली असता आरोपीने पिडीतेस गावावरुन अकलुज येथे आणुन शंकरनगर येथिल शिवपार्वती मंदीरात दोघांनीच लग्न केले. त्यानंतर अक्षय शिंदे व पिडीत मुलगी हाँस्पिटलच्या जवळ भाडोत्री रुमवर एकत्र राहू लागले.

काही दिवसानंतर अक्षय शिंदे पिडीतेला टाळु लागल्याने पिडीत मुलीने अकलुज पोलीसात तक्रार दिली यावेळी पोलीसांनी अक्षय शिंदे यास त्याचे वडील , भाऊ यांना समक्ष बोलावुन घेवुन विचारणा केली असता अक्षय शिंदे याने मी पिडीते सोबत लग्न केले नसुन तिच्याशी माझा कसलाही संबध नसल्याचे सांगितले. अक्षय शिंदे याने आपल्याला फसवले असल्याचे लक्षात येताच पिडीत मुलीने दि १८ मार्च रोजी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध लग्नाचे अमीष दाखवून व लग्नाचा बनाव करुन शरीर संबध साधून फसवणुक केल्या प्रकरणी अक्षय धनाजी शिंदे रा.लवंग (वय २४) याचे विरुध्द भा.द वी कलम ३७६,३७६/२ एन यासह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी निरज राजगुरु हे करत असून आरोपीस माळशिरस येथिल न्यायलयासमोर हजर केले असता २२ मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकलुज ग्रामपंचायत महिला सदस्यावर खंडणीचा गून्हा ...२४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
दि.२० मार्च रोजी पिडीतीने अकलुज पोलीसात आपला पुरवणी जबाब नोंदविला. त्यामध्ये तिने दि.21 जानेवारी २०२१ रोजी ज्योती कुंभार यांनी पिडीतेला भेटुन अरोपीकडुन पैसे मिळवुन देते असे सांगितले. नंतर दोन्ही बाजुच्या कुटुंबीयांच्या बैठका घेतल्या. सुरवातीला आरोपी अक्षय च्या पालकांकडे पिडीत मुलीसाठी आणि तिच्या शिक्षणासाठी ५ लाख रुपयांची मागणी ज्योती कुंभार यांनी केली. त्याच बरोबर पिडीत मुलगी व आरोपी यांनी तिन महिने एकमेकांशी कसलाही संपर्क न ठेवण्याबद्दल सांगितले . दरम्यान मागणी केलेल्या पाच लाखांपैकी मुलाच्या पालकाकडुन १ लाख २५ हजार रोख आणि सुजयनगर-४ येथे खोली मालकास भाड्यापोटी ऍडव्हान्स दिलेले ५ हजार रुपये ज्योती कुंभार यांनी परस्पर घेतले असे १लाख ३० हजार रुपये घेतले. तसेच अक्षय व पिडीत मुलीला बैठक दरम्यान मारहाण केल्याचेही पिडीतेने आपल्या जबाबात नमुद केले आहे. शेवटी मुलगी व अक्षय याला वेगळे करुन मुलीचे भविष्य व मुलीसाठी १५ लाख रुपयांची मागणी केली आणि १५ लाखातील २ रुपये मला द्या असे सांगितले. अशा आशयाची फिर्याद पिडीतेने अकलुज पोलीसात दिल्याने अकलुज पोलीसात अकलुज ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांचेवर भा.दं.वि .384,323,506 अन्वये खंडणी, मारहाण धमकी देणे यासह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता मे.न्यायालयाने त्यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली . सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु करीत आहेत.
0 Comments