Hot Posts

6/recent/ticker-posts

अकोले खुर्द येथे भारत पाटील मित्र मंडळाच्या वतीने सरपंच उपसरपंच यांचा सन्मान

 अकोले खुर्द येथे भारत पाटील मित्र मंडळाच्या वतीने सरपंच उपसरपंच यांचा सन्मान


 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथे सुर्ली व फुटजवळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच व नूतन सदस्य यांचा सन्मान लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
        यावेळी भारत पाटील यांनी नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे अभिनंदन करून आपापल्या गावात लोकांच्या हिताची कामे प्रामाणिकपणे करावीत असा संदेश दिला आहे.तर प्रा.दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास महादेव पवार, राम हं. पाटील, महादेव पवार, माजी सरपंच राम पाटील, माजी सरपंच विक्रम पाटील, बंकट महानवर, शशिकांत पाटील, गणेश हांडे, किशोर नवले,जगन्नाथ नवले, दीपक शंकर, लक्ष्मण काळे, अभिजित पाटील, अमर पवार, योगेश महाडिक, विठ्ठल नवले, ऋषीकेश पाटील, आगतराव निकम, गणेश पाटील, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण गोसावी, बिभीषण जाधव, गुरलिंग तोडकर, गोकुळ साळुंके, लालू तोडकर, उद्धव साळुंके, संपत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान : - 
     यावेळी सुर्लीचे रामकृष्ण काळे, सरपंच सुरेश पवार, श्रीरंग कदम,फुटजवळगावचे सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच विठ्ठल हरिदास हांडे, सदस्य रणजित नवले, बिभीषण जाधव, येताळा कोयले, शरिफा शेख, धनाजी महानवर यांच्यासह सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments