महाराष्ट्र राज्य जनरल कामगार व औद्योगिक सुरक्षा रक्षक युनियन सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी विष्णू बिचकुले यांची निवड..
टेंभुर्णी ( कटुसत्य वृत्त ) :- महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी व जनरल कामगार औद्योगिक सुरक्षा रक्षक युनियनच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे विष्णू बिचकुले यांची निवड संघटनेचे संस्थापक सरचिटणीस सहजराव पाटील यांनी केले असून त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक जनरल कामगार व सुरक्षा रक्षक युनियन ही संघटना महाराष्ट्रातील विविध औद्योगिक वसाहती साखर कारखाने हमाल व सर्वच कामगारांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारांकडून कामगारांची होणारी पिळवणूक तसेच कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करण्यात येते.
विष्णू बिचकुले है चळवळीत काम करणारे व अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक संघटन मध्ये जिद्दीने काम करणारे कार्यकर्ते असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी संघटनेच्या वरिष्ठांनी दिल्या असून आपल्या वरिष्ठांचा विश्वासास पात्र राहुन कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांना पुण्याचे व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम सोलापूर जिल्हा अध्यक्ष या नात्याने नक्कीच करतील असा विश्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यात कामगारांचे प्रश्न खूप मोठे असून साखर कारखानदारीत काम करणाऱ्या कामगारांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे तसेच ठेकेदारांच्या माध्यमातून शासकीय गोदाम मध्ये काम करणाऱ्या हमालांना अनेक महिने पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हमाल माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोरगरिबांना मिळणारा रेशन चा माल मिळणे अवघड झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची ही उपासमार होऊ लागली आहे. प्रश्नांचा विचार करून संघटनेने विष्णू बिचकुले यांची निवड केली असून त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून खासकरून हमाल माथाडी साखर कारखाना कामगार यांच्याकडून फोनवरून व समक्ष भेटून त्यांचे निवडीचे स्वागत करण्यात येत आहे
0 Comments