Hot Posts

6/recent/ticker-posts

सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

 सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न


सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- सहयाद्री फार्मसी महाविद्यालय व सांगोला ग्रामीण रुग्णालय (महालॅब्स) यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना व विविध उपक्रमांअर्तगत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यास कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळून उत्स्फुर्त सहभाग दर्शवून आरोग्य तपासणी केली. या शिबीरात कर्मचाऱ्यांचे निशुल्क रक्त तपासणी, थाईरॉईड, कॅल्शियम तपासणी करण्यात आली. 
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम फुले, डॉ. पुजा साळे, जिल्हा समन्वयक महालॅब्स सोलापूरचे श्री. शशिकांत डोंगरे, एल.बी.एम. महालॅब्स पंढरपूरचे श्री. सागर कांबळे, लॅब टेक्निशियन श्री. प्रवीण ननवरे, लॅब टेक्निशियन श्रध्दा जाधव,   महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. ओ. बी. डोके, डॉ. आर. एस. बाठे, व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले.


Reactions

Post a Comment

0 Comments