Hot Posts

6/recent/ticker-posts

युवकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे - प्रताप नलवडे

                युवकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे - प्रताप नलवडे                             माढा पं.स.सभापती विक्रमसिंह शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

लऊळ (कटुसत्य वृत्त ) :- युवकांनी बॅनरबाजी व इतरत्र वेळ न घालवता सामाजिक उपक्रम राबवून आपल्या गावचा विकास करावा असे प्रतिपादन माढा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप नलवडे यांनी केले. माढा पंचायत समितीचे विद्यमान सभापती विक्रमसिंह शिंदे यांचा वाढदिवस लऊळ ता.माढा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
मोफत सर्वरोग निदान शिबीर व वृक्षारोपण करत विक्रमसिंह शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचीन लोंढे पाटील,विक्रमसिंह शिंदे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष व  महावितरण सल्लागार समिती सदस्य अमोल नलवडे,सरपंच प्रशांत बोडके,उपसरपंच संजय लोकरे,माजी उपसरपंच वसंत नलवडे, ह.भ.प.सुधाकर लोकरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप पाटील,लक्ष्मण घुगे,गणेश लोंढे,गोरख घुगे,नूतन ग्रा.पं.सदस्य महेश बागल,कल्याण गाडे,नामदेव भोंग,पवन भोंग,पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे,गोरख गवळी, गजेंद्र गवळी,कॉ.बाळासाहेब चांदणे,सचिन गवळी,अनिल वाळूजकर,प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू नलवडे,सैफन नदाफ, महादेव बागल,मेघराज लंकेश्वर,राजेश चव्हाण,सचीन खारे,राम नलवडे,पत्रकार वसंत कांबळे, प्रवीण लोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन मोहन नलवडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित वैदकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील युवक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments