भारतीय जनता पार्टी ची माढा तालुक्यातील नवीन कार्यकारणी जाहीर केली
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त ) :- टेंभुर्णी येथील सनराइज् इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारणी आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली.
माढा तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढण्याच्या उद्दिष्टाने माढा तालुक्यामध्ये नवीन कार्यकारणी मध्ये जुन्यांना डच्चू देत नवीन तरुणांना संधी देत माढा तालुक्यामध्ये सर्व तालुका कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष आठ पदे देत विविध भाजपच्या माध्यमातून सातशे पदे देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
यामध्ये माढा तालुक्यातील कोंढार भागातील टेंभुर्णी जि प गटामध्ये गोविंद पवार यांना देण्यात आले आहे, तर माढा तालुक्यातील वरवडे येथे सोमनाथ गायकवाड यांना दिले आहे तसेच, माढा येथे मदन मुंगळे,विनायक आवारा,प्रतापराव देशमुख,अमृत आवताडे,मगन महाडिक,शामराव कदम,यांची तालुका उपाध्यक्षपदी तसेच योगेश पाटील,दत्तात्रय मोरे यांची तालुका सरचिटणीस पदी तर तात्या मोरे करण भगत,प्रशांत जाधव,जयसिंग देशमुख,प्रकाश चोपडे यांची तालुका चिटणीस पदी तसेच तात्या गोडगे यांची तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भाजयुमोच्या तालुकाध्यक्ष पदी उमेश पाटील सरचिटणीस पदी गिरिश ताबे तर उपाध्यक्ष पदी समाधान अनपट यांची निवड करण्यात आली. महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सिंधुताई मोरे किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी शिवाजी सुर्वे,अनु जाती मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी प्रा रविंद्र ननवरे,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवृत्ती तांबे तसेच आदिवासी मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप बारमुळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विविध सेलच्या तालुका संयोजकांची नियुक्ती करण्यात आली कामगार आघाडी मस्के,उद्योग आघाडी श्रीकांत लादे,भटके-विमुक्त आघाडी दादासाहेब कळसाईत,वैद्यकीय सेल डॉ सागर गिड्डे, कायदा सेल ऑड विजयकुमार आडकर,सहकार सेल नागनाथ कदम,सोशल मिडिया सेल दिनेश शिंदे,माजी सैनिक सेल आनंद गलांडे,ज्येष्ठ कार्यकर्ता श्रीधर शिंदे,प्रज्ञा सेल हरिदास रणदिवे,शिक्षक सेल भारत माने तसेच अध्यात्मिक समन्वय संयोजकपदी संकेत पाठक यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे नुतुन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील जिल्हा सचिव अमर शेंडे हे उपस्थित होते.
0 Comments